LIVE : युक्रेन-रशिया युद्धाचा दुसरा दिवस : आतापर्यंत १३७ मृत्‍यू, ३१६ गंभीर, पहाटेच युक्रेनच्या राजधानीवर हल्लाबोल, जगाने एकटे सोडल्याची युक्रेनची भावना

 
नवी दिल्ली ः युक्रेनविरोधात रशियाने पुकारलेल्या युद्धाचा आज, २५ फेब्रुवारीला दुसरा दिवस उजाडला आहे. आतापर्यंत १३७ लोकांच्या मृत्‍यूची बातमी आली आहे. ३१६ लोक गंभीर जखमी आहेत. रशियाने एकूण ३०२ हल्ले केले असून, यात १६० मिसाईल्स डागण्यात आले होते, तर ८३ हल्ले जमिनीवरूनच करण्यात आले. युक्रेनच्या सैन्याने रशियाचे ७ एअरक्राफ्ट, ६ हेलिकॉप्टर, ३० टँक नष्ट केले आहेत.

सध्या रशियाचे सैन्य युक्रेनच्या कोनाटोपमध्ये घुसले असून, बाकीच्या फोर्सेस राजधानी कीवकडे आगेकूच करत आहेत. कीवमध्ये पहाटे तीनच्या सुमारास धमाके करण्यात आले. युक्रेनचे राष्ट्रपती वोलोडिमीर जेलेंस्की यांनी पूर्ण सैन्याला युद्धात उतरण्याचे आवाहन केले आहे. सरकारने १८ ते ६० वयोगटातील लोकांना देश सोडण्यावर बंदी घातली असून, १० हजार नागरिकांना रायफल्स दिल्या आहेत. जगाने आम्हाला युद्धात एकटे सोडल्याची भावना राष्ट्रपतींनी व्यक्‍त केले. राष्ट्रपती जेलेंस्की म्हणाले, की रशियाचे सैन्य कीवमध्ये दाखल झाले आहे. त्यांचे पहिले टार्गेट मी आहे, नंतर माझे कुटुंब आहे.

रशियासोबत हे देश...
चीन, पाकिस्तान, क्‍यूबा, आर्मिनिया, कजाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, बेलारूस, अजरबेजान, ईराण, उत्तर कोरिया

युक्रेनसोबत हे देश..
अमेरिका, ब्रिटन, बेल्जियम, कनाडा, डेनमार्क, फ्रान्स, लक्‍जमबर्ग, नेदरलँड, इटली, जपान, दक्षिण कोरिया, ऑस्‍ट्रेलिया.
(भारताने अद्याप कुणाची बाजू घेतलेली नाही.)