NATIONAL NEWS ऐकावं ते नवलच, चक्क अंघोळ केल्याने झाला मृत्यू! जगातील सर्वात घाणेरडा माणूस म्हणून होती ओळख, ६७ वर्षानंतर घातली अंघोळ..!

 
वृत्तसंस्था : ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ऐकून तुम्हाला नवल वाटेल, परंतु हो अंघोळ केल्याने जगातील सर्वात घाणेरड्या व्यक्तीचा मृत्यू झाला. या व्यक्तीला चक्क ६७ वर्षानंतर ग्रामस्थांनी बळजबरीने अंघोळ घातली आणि त्याला मृत्यूचा सामना करावा लागला.

चांगल्या आरोग्यमय जीवनात अंघोळीचे महत्व सर्वांनाच ठाऊक आहे. परंतु या अंघोळीने कोणाचा जीव जाऊ शकतो, असा विचित्र प्रकार दक्षिणेकडील फार्स प्रांतातील देगाह गावात घडला आहे. जगातील सर्वात घाणेरडा व्यक्ती म्हणून ओळख असलेल्या  इराणचा रहिवासी अमू हाजी यांनी गेल्या ६७ वर्षापासून अंघोळच केली नव्हती. त्यामुळे त्याच्याजवळही कोणी जाऊ शकत नव्हते. अत्यंत गलिच्छ दिसणाऱ्या या व्यक्तीची कालांतराने  ‘जगातील सर्वात घाणेरडा माणूस’ म्हणूनच ओळख निर्माण झाली. काही दिवसांपूर्वी ग्रामस्थांनी या व्यक्तीला अंघोळ घालवण्याचे ठरविले.

त्यानंतर काहींनी किळसवाणे वाटत असले तरी नाक दाबून त्या घाणेरड्या व्यक्तीला जबरदस्तीने पकडण्याची हिंमत केली त्यानंतर त्याला पकडून बाथरूममध्ये नेले आणि अंघोळ घातली. सर्वांना वाटलं आता आंघोळ घातली म्हणजे हा स्वच्छ होणार, याची प्रकृती आणखी सुधारणार, परंतु झालं उलटच! तब्बल ६७ वर्षानंतर अंघोळ केल्याने त्या घाणेरड्या व्यक्तीची तब्येत आणखी बिघडायला लागली. त्याची प्रकृती एवढी गंभीर होत गेली. त्यानंतर काही दिवसातच त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आणि हा मृत्यू त्या गावकऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का देऊन गेला.

ज्याची भीती होती तेच झाले..

म्हणतात ना मनात नेहमी जसे विचार कराल तसेच होते. जगातील सर्वात घाणेरडा व्यक्ती असलेल्या  इराणचा अमू हाजी याला सुद्धा पाण्याची खूप भीती वाटत होती. त्याच्या मनात पाण्याविषयी एवढी भीती निर्माण झाली होती, की आपण आंघोळ केली, तर आपण आजारी पडू किंवा आपल्याला काही होऊ शकेल, अशी विचित्र अवस्था त्या घाणेरड्या व्यक्तीची झाली होती. शेवटी ज्याची भीती होती, तेच झाले या व्यक्तीची आंघोळ त्याच्या मृत्यूचे कारण ठरले.