INTERNATIONAL NEWS बाबो! बकरा कापत असल्याचे स्वप्न पाहत त्याने कापल स्वतःच गुप्तांग! रक्तबंबाळ झाला...!!
Aug 24, 2022, 08:31 IST
(वृत्तसंस्था): पश्चिम आफ्रिकेतील घाना देशातील एका शेतकऱ्यासोबत अजबच प्रकार समोर आलाय. शेतकऱ्याला झोपते बकरा कापत असल्याचे स्वप्न पडले मात्र प्रत्यक्षात झोपेत त्याने स्वतःचे गुप्तांग कापले. यामुळे रक्तबंबाळ झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आता त्याच्यावर मोठी शस्त्रक्रिया करावी लागणार नाही.
कोफी अट्टा अस जखमी शेतकऱ्याच नाव असून तो ४७ वर्षांचा आहे. झोपेतून त्याला जाग आली तेव्हा तो रक्तबंबाळ अवस्थेत होता. त्याच्या हातात चाकू होता. त्याच्या गुप्तांगातून प्रचंड रक्तस्त्राव होत होता. घटना घडली तेव्हा त्याची बायको घरात नव्हती. ती घरात आल्यानंतर तिला घडला प्रकार समजला. पत्नीने त्याला दवाखान्यात भरती केले , यावेळी डॉक्टरही क्षणभर चक्रावून गेले.
कोफी ने झोपण्याआधी टरबूज कापून खाल्ले होते. टरबूज कापण्याचा चाकू तो झोपलेल्या खुर्ची शेजारी असलेल्या टेबलावरच ठेवला होता." मला वाटले माझ्यासमोर बकरा आहे, तो मी चाकूने कापत आहे" असे स्वप्न मला पडत असल्याचे कोफीने सांगितले. मात्र त्या चाकूने कोफीने स्वतःचे गुप्तांग कापून टाकले.