INFO फाटकी, मळकी अन् जुनी जीन्स; किंमत तब्बल ६२ लाख! काय आहे या जीन्स मध्ये असं? जाणून घ्या

 
वृत्तसंस्था: काहीपण का राजेहो..जुन्या, फाटक्या अन् त्यातही मळक्या जीन्स ला कोण विकत घेईल का? अन्  तेही ६२ लाखांत, छे.. छे.. फाका नका हाणू असच म्हणाल तुम्ही.. पण ते खरय बरका. एका जुन्या, फाटक्या अन् मळक्या जिन्स ला चक्क तब्बल ६२ लाख रुपयांची बोली लागली आहे. १९८० च्या दशकातली ही जीन्स असून ती  ४५ वर्षे जुनी आहे.

 न्यु मेक्सिको मध्ये झालेल्या एका लिलावात ही जीन्स विकण्यात आली. अतिशय जुनी फॅशन असलेल्या लेव्हीस कंपनीच्या या जीन्सला एका क्लोथिंग डिलरने विकत घेतले. ही जीन्स अतिशय हटके असल्याचे लिलावात सहभागी असणाऱ्यांचे म्हणणे आहे. काही वर्षाआधी एका खाणीत ही जीन्स सापडली होती.

ही जीन्स तेव्हाच्या एखाद्या मजुराने घातलेली असावी. या जीन्सचे डिझाईन अतिशय हटके आणि जुन्या फॅशनचे आहे..असे आम्ही नाही तर खरेदी करणारे म्हणतात.! आपल्याला त फक्त ती जीन्स फक्त फाटकी , मळकी अन् जुनीच दिसते बॉ..!