पती, पत्नी और "वो'... नवरा रात्री अचानक घरी आल्यानंतर पत्नी दिसली प्रियकरासोबत!; संतप्त नवऱ्याने पुढे जे केले ते वाचूनच तुम्ही म्‍हणाल वाह रे पठ्ठ्याऽ!

 
ग्वाल्हेर ः लग्नाला गेलेला नवरा दुसऱ्या दिवशीच घरी येणार असल्याने तिने प्रियकराला घरी बोलावून घेतले. रात्री दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले असतानाच नवरा घरी आला. ती घराची कडी आतून लावायलाही विसरली होती. पत्‍नी बेडवर चक्क प्रियकरासोबत झोपलेली पाहून त्‍याचा पारा चढला. त्‍याने पत्‍नीला झोडपलेच, पण तिच्या प्रियकराला यथेच्‍छ चोप दिला. त्‍याला बलात्‍काराची अडकविण्याची धमकी देऊन त्‍याच्या माफीनाम्याचा व्हिडिओ तयार केला. त्‍याच्याकडून ७० हजार रुपये वसूल केले. पैसे घेतल्यावरही हा व्हिडिओ व्हायरल केला... पत्‍नीच्या प्रियकराला धडा शिकवल्याचा हा अनोखा कारनामा मध्यप्रदेशातील भिंड शहरात समोर आला आहे.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, रवी गुर्जर या युवकाचे भिंड येथील एका विवाहितेसोबत प्रेमसंबंध होते. पती घरी नसला की ती रविला घरी बोलावून घ्यायची. दोन दिवसांपूर्वीही तिने असेच तिला रात्री बोलावून घेतले. एका लग्नाला जातो म्हणून तिचा नवरा घराबाहेर गेला होता. दुसऱ्या दिवशीच येईल, असे त्याने तिला सांगितले होते.

या संधीचा फायदा घेत तिने रवीला फोन केला. प्रेमाच्या धुंदीत ती घराची कडी आतून लावायला विसरली. दोघे बेडवर असतानाच तिचा नवरा अचानक घरी आला. दरवाजातून थेट बेडरूमध्ये आल्यानंतर त्‍याला नको ते दृश्य दिसले. पत्नी तिच्या प्रियकरासोबत पाहून संतप्त पतीने पत्‍नीला मारहाण केल्यानंतर प्रियकराकडे मोर्चा वळवला. बेदम चोप दिल्यानंतर त्याला बलात्काराच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली.

प्रियकर हात जोडून माफी मागत होता. त्याने रवी माफी मागत असतानाचा व्हिडिओ शूट केला. त्यानंतर त्याच्याकडे पैशाची मागणी केली. रवीने त्याचे एटीएम कार्ड त्याला दिले. त्याने एका मित्राला एटीएममध्ये पाठवून ७० हजार रुपये काढून आणायला लावले. पैसे मिळाल्यानंतर त्याने रवीला सोडून दिले. एवढ्यावरच पती थांबला नाही तर त्‍याने रवीचा माफी मागतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. मारहाण झाली, पैसेही गेले आणि वरून बदनामीही झाल्याने रवीने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.