हिंदू असल्याचे भासवून मुस्लिम तरुणाचा ७ वर्षे लैंगिक अत्याचार

 
वाराणसी : हिंदू नाव धारण करून तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवून मुस्लिम तरुणाने तब्बल ७ वर्षे लैंगिक अत्याचार केला. यामुळे पीडिता गर्भवती झाली. तिने मुलाला जन्म दिला. ७ वर्षांनंतर तो मुस्लिम असल्याचे तिला कळले. त्याने लग्नाला नकार दिल्यानंतर ६ वर्षांच्या मुलाला सोबत घेऊन तिने पोलीस ठाणे गाठले. उत्तरप्रदेशातील वाराणसी शहरात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, नूर मोहम्मद या ट्रकचालकाने स्वतःचे नाव लाला बाबू असल्याचे तरुणीला सांगितले होते. भेटीगाठीतून पीडित तरुणी त्याच्या प्रेमात पडली. लग्नाचे आमिष दाखवून त्याने तरुणीशी शारीरिक संबंध ठेवले. तरुणी गर्भवती राहिल्याने लाला बाबूने तिला हकुलगंज भागात स्वतःसोबत ठेवले. तिचा छळ करून तिला माहेरावरून २ लाख रुपये आणायला भाग पाडले. सप्टेंबर २०१५ मध्ये तरुणीने एका मुलाला जन्म दिला.

मात्र तोपर्यंत दोघांनी लग्न केले नव्हते. तिने लग्नाची मागणी केल्यानंतर हा लाला बाबू नसून नूर मोहम्मद असल्याचे तिला कळले तेव्हा तिला धक्काच बसला. नूर मोहम्मदने लग्नाला नकार दिला असून, आता त्याचे दुसऱ्या महिलेशी संबंध आहेत, असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. मला आणि माझ्या मुलाला जिवाने मारण्याची तो धमकी देत आहे. जातीवाचक शिविगाळ करत आहे, असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. तिच्या तक्रारीवरून शिवपूर पोलीस ठाण्यात नूर मोहम्मदविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.