जिल्हा परिषद शिक्षकाची आत्महत्या! विद्यार्थी ढसाढसा रडले; घाटबोरीच्या शाळेत होते शिक्षक

 
teacher
मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): घाटबोरी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असलेल्या शिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. काल,२५ मार्चच्या संध्याकाळी ही घटना घडली. विजय श्यामराव पोटरे (३८, रा.मेहकर) असे आत्महत्या करणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे.
 

विजय पोटरे हे मेहकर तालुक्यातील घाटबोरी येथील शाळेवर शिक्षक होते. विद्यार्थीप्रिय व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे शिक्षक म्हणून पोटरे यांची ओळख होती. काल, सायंकाळी फिरायला जातो म्हणून ते घराबाहेर पडले. मात्र संध्याकाळ पर्यंत ते न परतल्याने घरच्यांनी शोध सुरू केला. मात्र ते सापडल्याने कुटुंबीयांनी पोलिस ठाणे गाठले. तपासाअंती रात्री उशिरा जामगाव रस्त्यावरील डॉ.आनंद सावजी यांच्या शेतात विजय पोटरे यांचा मृतदेह लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. पोटरे यांच्या मृत्युप्रकरणी मेहकर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  पोटरे यांनी आत्महत्या का केली याची नेमकी माहिती समोर येऊ शकली नाही. पोटरे यांच्या मृत्यूचे वृत्त समजताच घाटबोरी गावावर शोककळा पसरली. विद्यार्थी ढसाढसा रडले..!