बुलडाण्यात जिल्हा परिषद कर्मचारी महिलेची आत्महत्या! ऑफिसवरून घरी परतल्या अन् टोकाचा निर्णय घेतला; असं काय झालं?

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा जिल्हा परिषदेच्या वित्त विभागात कार्यरत असलेल्या एका तरुण कर्मचारी महिलेने गळफास लावून आत्महत्या केली. आज,२ ऑगस्टच्या संध्याकाळी ही घटना घडली. सोनल मनीष परदेसी (वय 35) असे मृतक महिलेचे नाव आहे.
संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर सर्क्युलर रोडवरील जिल्हा परिषदेच्या शासकीय निवासस्थानी पोहोचलेल्या सोनल यांनी आत्महत्या केली. सासू सासरे घरी असतांना त्यांनी दुसऱ्या खोलीत जाऊन पंख्याला गळफास लावला. त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला. सोनल परदेसी यांनी एका एकी एवढा टोकाचा निर्णय का घेतला? याचे कारण वृत्तलिहेपर्यंत कळु शकले नव्हते.तपास बुलडाणा शहर पोलिस करीत आहेत.