भरधाव ऑटो उलटून युवक ठार: शेगाव तालुक्यातील घटना
Fri, 10 Mar 2023

बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चालकाचे निष्काळजीमुळे ऑटो उलटून त्यात बसलेला २५ वर्षीय युवक डोक्यावरून चाक गेल्याने मार लागल्याने तो ठार झाला तर ऑटोचालक व ऑटोमध्ये बसलेले काही जण जखमी झाल्याची घटना खिरोडा ते मनसगाव दरम्यान ७ मार्च रोजी सायंकाळी ४ वा. दरम्यान घडली.
याबाबत अमोल रामदास रोहनकार वय ३२ वर्ष रा. मनसगांव ता. शेगाव यांनी शेगाव ग्रामीण पोस्टेला फिर्याद दिली की, अनंता एकनाथ कोठे रा. मनसगांव याने त्याचे ताब्यातील ऑटो क्र. एम. एच. २८ - २३७७ हे भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालवून पलटी केले. त्यामुळे यात बसलेला लक्ष्मण नारायण खेट्टे वय २५ वर्ष रा. मनसगांव हा युवक गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला.
तसेच चालक व ऑटोत बसलेले काही जण जखमी झाले आहेत. अशा फिर्यादवरून पोलिसांनी ऑटो चालक आरोपी विरुध्द अप क्र.६४/२०२३ कलम ३०४ (अ), २७९, ३३७ भादंवि नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉ धनराज माने करत आहेत.