'तूझी ऊंची कमी, तुझ्यापेक्षा चांगली भेटली असती' सासरचे लोक हिणवायचे! अन् नवरा रोज कुटायचा! शेगावात आपबिती सांगताना ढसाढसा रडली विवाहिता..

 
Hxnxn
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : 
पैश्यासाठी सासरच्या छळाला कंटाळून माहेरी राहण्यासाठी आलेल्या पिडीतेने पतीसह सासरच्या अन्य लोकांविरुद्ध तक्रार दिली. त्यानुसार अकोला जिल्ह्यातील विवारा येथील पिडीतेच्या सासरच्या सात जणांविरुद्ध शेगाव शहर पोलीस ठाण्यात मंगळवारी, २६ मार्चला गुन्हा दाखल करण्यात आला. 
दिलेल्या तक्रारीनुसार, पीडित विवाहिता सध्या माहेरी शेगाव येथे राहते. सासरी नांदत असताना पती पांडुरंग शेगोकार हा वारंवार माहेरहून पैसे आणण्यासाठी सांगायचा 'तुझ्या वडिलांनी लग्नामध्ये मला हुंडा कमी दिलेला आहे. मला नवीन मोटरसायकल विकत घ्यायची, तर तू माहेरहून दीड लाख रुपये घेऊन ये.. असा तगादा त्याने लावला होता. मात्र यासाठी पिडीतेने नकार दिला तर तिचा पती पांडुरंग हा शिवीगाळ करत मारहाण करायचा. आणि पीडितेची सासू अन्नपूर्णा शेगोकार व सासरे बळीराम शेगोकार , जेठ संतोष शेगोकार, जेठानी छाया शेगोकार हे सर्व पीडीतेला म्हणायचे की, तुझी उंची कमी आहे, पांडुरंगला तुझ्यापेक्षा चांगली बायको मिळाली असती. असे म्हणत ते हिणवायचे असे पिडीतेने तक्रारीत म्हटले आहे. २ मे २०१८ साली पांडुरंग शेगोकार याच्याशी विवाह झाला होता. मात्र वारंवार सासर कडून होणाऱ्या छळाला कंटाळून ३० ऑक्टोबर २०२० रोजी पीडिता माहेरी परतली. असेही पिडीतेने तक्रारीत सांगितले.