चिंता वाढवणारी बातमी; जिल्ह्यात २ दिवसांत ५ जणी गायब; जया, वैष्णवी,रेणुका, रंजनाच्या घरचे परेशान झाले....

 
jdjdfd
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात बेपत्ता होणाऱ्यांची संख्या काही कमी व्हायचे नाव घेत नाही. गेल्या २ ते ३ वर्षांपासून हे सत्र सुरूच आहे. आता पुन्हा बेपत्ता झालेल्यांची नवी आकडेवारी समोर आली आहे. जिल्ह्यात गेल्या २ दिवसांत ५ जण बेपत्ता झाल्याची नोंद आहे. बेपत्ता झालेल्या सर्व महिला/ मुली आहेत.
 

 ९ आणि १० ऑक्टोबरला जिल्ह्यातून ५ जणी बेपत्ता झाल्यात. जया विक्रम वाघ ही २० वर्षीय तरुणी खामगाव शहरातील बाळापूर फैल भागातून गायब झाली. वैष्णवी रामपाल सपकाळ ही १९ वर्षीय तरुणी मोताळा तालुक्यातील दाताळा येथून गायब झाली. रेणुका विष्णू गाडेकर ही एक १८ वर्षीय तरुणी बुलडाणा तालुक्यातील साखळी येथून गायब झाली. बुलडाणा ग्रामीण पोलीस याप्रकरणी मिसिंग ची नोंद करण्यात आली आहे.

  जळगाव जामोद तालुक्यातून सौ सुकुमाबाई ओमप्रकाश किराळे ही २० वर्षीय विवाहिता गायब झाल्याची नोंद जळगाव जामोद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. रंजना राजेश सोनकांबळे ही ३३ वर्षीय विवाहिता सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड येथून बेपत्ता झाली आहे. बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्याची विनंती कुटुंबीयांनी केली आहे.