राजुरमध्ये महिलेची हातचलाखी; बॅगमध्ये ठेवलेले ३० हजार दामटले! महिलेविरुद्ध गुन्हा..
Updated: Jun 7, 2024, 15:17 IST
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) राजुर परिसरात महिला चोर सक्रिय झाल्या आहेत. याआधी देखील अशा घटना समोर आल्या. तशीच एक ताजी घटना घडली आहे. महिलेने हातचालाखीने बॅगमध्ये ठेवलेले तीस हजार लंपास केल्याची घटना राजूर येथे घडली. या प्रकरणी तक्रारीवरून बोराखेडी पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
जाहिरात👆
राजुर येथील सेवानिवृत्त कर्मचारी दयाराम बापू मेढे ह. मु. बुलढाणा यांनी ५ जून रोजी बोराखडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली, २५ मे रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास राजुर येथे त्यांनी बॅगमध्ये ठेवलेले ३० हजार रुपये एका महिलेने चोरले, तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास बोराखेडी पोलीस करत आहेत. राजुरसह बोराखेडी पोलीस स्टेशन अंतर्गत विविध गावांमध्ये घरफोडी व चोरीच्या घटना उघडकीस येत आहे. दिवसाढवळ्या होत असलेल्या चोरीच्या गुन्ह्यामुळे चोरट्यांना कायद्याचा धाक उरला नाही ? असा सवाल उपस्थित होत आहे.