माहेरहून पैसे आणण्यासाठी महिलेचा छळ! पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध बुलडाणा शहर ठाण्यात गुन्हा दाखल..

 
जदंड

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): माहेरहून दोन लाख रुपये आणण्याचा तगादा लावणाऱ्या पतीसह सासरच्या चौघांनी शारीरिक व मानसिक छळ केल्याची तक्रार पीडित महिलेने काल २३ फेब्रुवारीला शहर पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात पीडित महिलेने दिलेल्या तक्रारी नुसार त्यांचे सासर लातूर जिल्ह्यातील औसा येथील आहे. आपल्या भावाकडून दोन लाख रुपये घेऊन ये या कारणावरून त्यांच्यावर कित्येक दिवसांपासून शारीरिक व मानसिक छळ सुरू होता. इतकच नाही तर पती शिवप्रताप सिंह चव्हाण हा चाप्टा बुक्क्यांनी मारहाण करत होता, अश्या छळाला कंटाळून सध्या पिडीत महिला ह्या माहेरी म्हणजेच बुलढाण्यात राहत आहेत. शेवटी कंटाळून त्यांनी बुलढाणा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पती शिवप्रतापसिंह चव्हाण, याच्यासह कांताबाई चव्हाण, विश्वप्रतापसिंह चव्हाण ,दिपाली चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल सुनील किनगे करत आहेत