BIG BREKING चिखलीत महिला पोलिस कर्मचाऱ्यासह तिच्या चिमुकलीची हत्या! पतीनेही घेतला गळफास

 
ps

चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली शहरातून मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. चिखली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिलेचा आणि  तिच्या चिमुकलीचा खून करण्यात आला असून तिच्या पतीने आत्महत्या केली आहे. चिखली शहरातील पंचमुखी महादेव मंदिर परिसरात ही घटना उघडकीस आली आहे.

वर्षा दंदाले असे महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. तिच्या दीड वर्षाच्या चिमुकलीचा देखील पोटात चाकू खुपसून खून केला.मायलेकीचा खून केल्यानंतर पतीने अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीतील कवठळ शिवारात गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून खुनाच्या कारणाचा शोध घेत आहेत. यासंबंधीचे विस्तृत वृत्त थोड्यावेळाने बुलडाणा लाइव्ह वर वाचकांना वाचता येईल.