ब्लेडच्या सहाय्याने सपासप वार ; युवक जखमी! येळगावच्या दीपक विरशीद सह दोघांवर गुन्हा.

 
Jjjd

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शुल्लक कारणावरून युवकावर ब्लेड ने वार करून जखमी केल्याप्रकरणी येळगावच्या स्वप्नील विरशीद,दीपक विरशीद, सुरज नाटेकर (सर्व रा. येळगावं) यांच्या विरुध्द बुलडाणा शहर ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 घटना शनिवार, २ मार्च रोजीची आहे. याप्रकरणी प्रकाश कुरुपाड यांनी ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार संत गजानन महाराजांच्या महाप्रसादानिमित्त येळगावं येथील मंदिरात त्यांच्या मुलगा स्वप्नील कुरुपाड हा वांगे कापत होता. त्यावेळी दीपक विरशीद,स्वप्नील विरशीद, आणि सुरज नाटेकर हे तिघे दारू पिवून आले. मोठ्या आवाजाने त्यांनी धिंगाणा घालायला सुरुवात केली. त्यावेळी स्वप्नील कुरूपाड यांनी आवाज करू नका असे म्हटले असता तू गप्प रहा असे म्हणून दीपक विरशीद याने त्याचे हातातील ब्लेड वर वार केले. डोक्याच्या डाव्या बाजूला, दाढीवर, पोटावर , हातावर ब्लेड ने वार करून स्वप्निल कोरफड याला जखमी करण्यात आले. तसेच स्वप्निल विरशीद व सुरज नाटेकर यांनी जीवनी मारून टाकतो अशी धमकी दिली. असे तक्रार अर्जात म्हटले आहे. अश्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ सुभाष म्हस्के करत आहेत.