बायको हरवली, नवऱ्याची पोलिसांत धाव

बुलडाणा शहरातील घटना
 
file photo

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः काही महिन्यांपूर्वी लग्न झालेली नवविवाहिता घरून निघून गेली. ही घटना काल, २१ नोव्हेंबर रोजी बुलडाणा शहरातील महावीरनगरात घडली. याप्रकरणी नवऱ्याने आज, २२ नोव्हेंबर रोजी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली व बायको शोधण्याची विनंती पोलिसांना केली आहे.

सौ. पायल जयकुमार अग्रवाल (१९, रा महावीरनगर, बुलडाणा) असे बेपत्ता विवाहितेचे नाव आहे. लॉकडाऊन काळातच तिचा विवाह झाला होता. काल रात्री ९ च्या सुमारास ती घरातून कुणाला काहीही न सांगता निघून गेली. बराच वेळ होऊनही ती न परतल्याने घरच्यांनी शोध घेतला. मात्र तरीही न सापडल्याने पती जयकुमार अग्रवाल यांनी आज पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली व बायको शोधण्याची विनंती पोलिसांना केली.