बायकोसोबत का बोलत होता? तुझ्यामुळे बायको मला सोडून गेली...; तरुणाला जीवे मारण्याची धमकी!, खामगावातील घटना

 
file photo
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तू माझ्या बायकोसोबत बोलत होता म्‍हणून माझी बायको मला सोडून गेली, असे म्‍हणून शिविगाळ करत २१ वर्षीय तरुणाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार खामगाव शहरातील साईनगर वाडीत समोर आला आहे. काल, १ जानेवारीला दुपारी ही घटना घडली.
मयूर विजय शेलार (२१, रा. साईनगरवाडी, खामगाव) याने या प्रकरणात खामगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. आशिष जयराज पूर्वे, अजय जयराज पूर्वे (रा. तायडे कॉलनी, खामगाव)  अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. माझ्या बायकोसोबत का बोलत होता. तुझ्यामुळे बायको मला सोडून गेली, असे म्हणून आशिष मयूरला शिविगाळ करू लागला. अजयनेही त्‍याला साथ देत दोघांनी कुऱ्हाडीने तोडून टाकण्याच्या व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या, असे मयूरने तक्रारीत म्‍हटले आहे.