पहिली असताना दुसरीचा नाद लागला अन् संसाराचा सत्यानाश झाला! अनैतिक संबंध टिकवण्यासाठी बायकोला जीवाने मारण्याचा प्रयत्न;म्हणे,मला तिच्यासोबत रहायचे तुला खतम् करतो! जलंब पोलीस ठाण्यात विवाहितेची तक्रार

 
Kraim
शेगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बायको आणि एक मुलगी असतांना नवऱ्याचा दुसरीवर जीव जडला. आधी बायकोपासून हे लपवण्याचा प्रयत्न केला. मात्र बाहेरच्या महिलेशी  नवरा गुलू - गुलू करीत असल्याचे तिच्या लक्षात आले. तिने नवऱ्याला जाब विचारला तेव्हा नवऱ्याने स्क्रू ड्रायव्हर तिच्या पोटात खुपसून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. जलंब पोलीस ठाण्यात विवाहितेने दिलेल्या या तक्रारीने पोलीसही चक्रावले आहेत. विवाहितेच्या तक्रारीवरून तिच्या पतीसह सासरा व सासू विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय

  सौ.रेश्मा चेतन खंडेराव(२८, हमु भीमनगर, जलंब) या विवाहितेने प्रकरणाची तक्रार दिली आहे. रेश्मा यांचा विवाह २०१३ मध्ये  चेतन बाबाराव खंडेराव(३२, रा. तुलशेतपाडा, आंबेडकर नगर,भांडुप,मुंबई) याच्याशी झाला होता. तक्रारीनुसार लग्नानंतर केवळ १५ दिवस रेश्मा यांना सासरच्या मंडळींनी चांगले वागवले. रेश्मा यांचा सासरा दारू पिऊन शिवागाळ करायचा, मात्र तरीही रेश्मा यांनी ते निमूटपणे सहन केले. दरम्यान काही काळानंतर रेश्मा यांना एक मुलगी झाली, तिचे नाव जिविका असून ती सध्या साडेचार वर्षांची आहे.

   
दुसरीचा नांद लागला...!

  रेश्मा यांचा पती चेतन हा खाजगी वायरमन म्हणून काम करीत होता. कामासाठी त्याचे नेहमी बाहेरगावी येणे जाणे असायचे. गेल्या दीड वर्षांपासून नाशिकच्या एका महिलेशी चेतनची ओळख झाली. ओळखीतून चेतनचे त्या महिलेशी अनैतिक संबंध निर्माण झाले असे रेश्मा यांनी तक्रारीत म्हटले आहे. चेतन वारंवार त्या महिलेशी फोनवर बोलत होता, रेश्मा यांनी पतीला महिलेशी फोनवर पकडल्याचा दावा सुद्धा तक्रारीत केलाय. चेतन वारंवार नाशिक ला महिलेला भेटायला जात होता. रेल्वेचे तिकीट सुद्धा रेश्मा ला घरात मिळून आले. त्या महिलेचे चेतन सोबत फोटो असल्याचेही रेश्मा यांनी  तक्रारीत म्हटले आहे.  चेतनचे महिलेसोबत अश्लील संभाषणाचे रेकॉर्ड सुद्धा आपण ऐकल्याचा दावा रेश्मा यांनी तक्रारीत केला आहे.
    
प्रकरण चव्हाट्यावर आल्यावर...

  दरम्यान चेतनचे नाशिकच्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याची खात्री पटल्यानंतर सौ.रेश्मा यांनी चेतनला याबद्दल जाब विचारला. तेव्हा चेतन ने कबुली दिली, पुन्हा असे होणार नाही म्हणत बायकोची माफी मागितली. मात्र त्यानंतर सुद्धा चेतन चे लफडे सुरूच होते. चेतन आता बायकोला मारहाण करू लागला. मला त्या महीलेसोबत रहायचे आहे,तुला खतम करून टाकीन अशी धमकी चेतनने दिली. त्यानंतर जवळ असलेला स्क्रू ड्रायव्हर रेश्माच्या पोटात खुपसण्याचा प्रयत्न केला, मात्र रेश्मा ने आरडाओरडा करून कशीबशी चेतनच्या तावडीतून सुटका करून घेतली. मुलीला घेऊन रेश्मा माहेरी जलंब येथे पोहचली.  २०२१ च्या ऑक्टोबर महिन्यापासून ती माहेरी राहते, नवरा तिला नांदवायला तयार नाही असे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून पोलिसांनी रेश्मा यांच्या पतीसह सासू व सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.