गाव करी तो राव काय करी! महिला सरपंचाचा रुईखेड मायंबात अवैध धंदे बंदीचा ठराव!

 
Ghatavr
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बेकायदा दारू विक्रीने जिल्ह्यात अनेक संसाराची राख रांगोळी झाली. मात्र राज्य उत्पादन शुल्क म्हणा की पोलीस यंत्रणा हप्तेखोरीत गुंतल्याचा आरोप होतोय. अशा परिस्थितीत नारीशक्ती तोंड देऊ शकते हे तालुक्यातील रुईखेड मायंबा येथील महिला सरपंचांनी दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी ७ फेब्रुवारीला विशेष ग्रामसभेचे आयोजन करून बेकायदा दारू विक्री, जुगार मटका बंद करण्याचा ठराव घेतला.

बुलडाणा तालुक्यातील रुईखेड मायंबा गाव परिसरात वरली‎ मटक्याचा, देशी विदेशी दारू व्यवसाय मोठ्या‎ प्रमाणात चालू करण्यात आले होते. हे अवैध‎ धंदे बंद करण्याकरता चांडोळ येथील सरपंच‎ पोलिस पाटील उपोषणाला बसले होते तसेच‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ रुईखेड येथील युवकांनी देखील मागील वर्षी २‎ ऑक्टोबर रोजी धाड पोलीस स्टेशन येथे एक‎ दिवसीय धरणे आंदोलन केले होते. तरी‎ देखील सुरु असलेले अवैध धंदे बंद झाले‎ नाही. जागोजागी मोबाइलद्वारे वरली घेण्यात‎ येते. धाड मध्ये पोलिस स्टेशनच्या हाकेच्या‎ अंतरावर स्टॉल लावून वरली सर्रासपणे सुरू‎ असल्याचे दिसून येते. त्यामुळे गावांमध्ये एक समिती गठीत करुन सुरु असलेले अवैध धंदे‎ बंद करण्याकरता ठराव घेण्यात आला.‎यावेळी सरपंच सुरेखा अनिल फेपाळे, उपसरपंच‎ ज्ञानेश्वर रामेकर, ग्रामपंचायत सदस्य सतीश‎ वाघमारे, शिवाजी नप्ते, सिद्धार्थ मगर, राहुल‎ काकफळे, विकास उगले, संदीप उगले,‎ अनिल फेपाळे, पोलिस पाटील समाधान‎ उगले यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.

माता रमाईंच्या जयंतीदिनी आदर्श पाऊल...

 रुईखेड मायंबा येथील‎ ग्रामपंचायतीच्या वतीने  ७ फेब्रुवारी रोजी‎ माता रमाई यांच्या जयंती दिनानिमित्त विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले‎ होते. दरम्यान माता रमाई यांना आदर्श विचारांनी मानवंदना देण्याचे ठरले.या ग्रामसभेमध्ये मागील अनेक‎ दिवसांपासून रुईखेड मायंबासह परिसरात सुरु‎ असलेले वरली मटका सह इतर अवैध धंदे‎ सुरू आहेत. त्यामुळे दारूबंदी‎ महिला समिती व पुरुषांची एक समिती गठित‎ करण्यात आली व बेकायदा व्यवसाय बंदीचा ठराव घेण्यात आला.