ये क्या दिन आ गये? समलिंगी संबंधांतून मोठे कांड! मित्राने मित्रावरच केला अनैसर्गिक अत्याचार; वर्षभरापासून घेत होता उपभोग; कंटाळून पिडीत तरुणाने केले विषप्राशन! जळगाव जामोद तालुक्यातील खळबळजनक घटना

 
जळगाव जामोद(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जळगाव जामोद तालुक्यातून एक अतिशय खळबळजनक बातमी समोर आली आहे. मित्राने मित्रावरच अनैसर्गिक अत्याचार केला. तब्बल एक वर्षापासून मित्राच्या शरीराचा उपभोग घेत होता.मात्र सातत्याने होत असलेल्या या प्रकाराला कंटाळून पिडीत तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला. सध्या पिडीत तरुणावर अकोला येथे उपचार आहे. पिडीत तरुणाचे वय २३ वर्षाचे असून आरोपी तरुण २७ वर्षाचा आहे.
आरोपी येऊन जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथील आहे. त्याची त्याच्या २३ वर्षीय मित्रावर वाईट नजर पडली. त्यातून संबंध वाढवत पिडीत तरूणाशी शारीरिक संबंध ठेवले. वासनेची भूक वाढत गेल्याने हा प्रकार नेहमी होऊ लागला. मात्र पिडीत तरुण याला नकार देत होत, हा प्रकार जबरदस्ती होऊ लागल्याने पिडीत तरुणाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सध्या पिडीत तरुणावर अकोल्यात उपचार सुरू आहेत.पिडीत तरुणाच्या जबाबावरून पोलिसांनी भगवान प्रमोद वाघ (२७, रा. भेंडवळ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.