भावी बायकोला भेटायला गेला; आधी बलात्कार केला नंतर गळा चिरला! १७ मार्चला होणार होते लग्न; सगळ काही ओके असताना "त्या" अर्ध्या तासात नेमक झालं तरी काय? मेहकर तालुक्यातील वरूडच्या तरुणाचा प्रताप..

 
Ygfgu

मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): तिने रंगवलेल्या स्वप्नांचा चुराडा झाला. घरातले सगळे जण "त्या" दिवशी बस्ता फाडायला गेलेले. त्यामुळे ती घरी एकटीच..ही संधी साधून तिचा होणारा भावी नवरा तिला भेटायला येणार होता..तो येणार असल्याचे आधी तिला माहित होतेच..तीही त्याची आतुरतेने वाट पहात होती..अखेर भर दुपारी तो आला..पण त्यानंतर जे झालं ते धक्कादायक अन् अनपेक्षित असच होत..होणारी बायकोचं तर आहे असे म्हणून त्याने तिच्याकडे शारीरिक संबंधाचा आग्रह झाला..तिने विरोध केल्यानंतर त्याच्यातला सैतान जागा झाला..त्याने जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले..त्यानंतर तिची गळा चिरून हत्या करून तो पसार झाला...१८ फेब्रुवारीच्या दुपारी जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील बेलोरा गावात ही घटना घडली..अत्याचार करून खून करणारा संशयित आरोपी मेहकर तालुक्यातील वरूडचा सुशील सुभाष पवार हा आहे..!

 सुशीलचे बेलोरा येथील दीप्ती उर्फ सपना (१७) हिच्याशी लग्न ठरले होते. डिसेंबर महिन्यातल्या २० तारखेला बेलोरा येथे त्यांचा साखरपुडा झाला होता. १७ मार्च २०२३ अशी लग्नाची तारीख ठरली होती. दरम्यान सुशील आणि सपना एकमेकांशी तासंतास फोनवर बोलायचे. याआधीही दोन तीन वेळा तो सपनाला भेटला होता. १८ फेब्रुवारीला दुसरबिड येथे बस्ता फाडण्याचे दोन्हीकडील कुटुंबाचे ठरले होते. त्यानुसार सपनाचे वडील, आई, काका यांच्यासह १२ ते १३ जण दुपारी दुसरबिड येथे गेले होते. सुशिलचे आई ,वडील ,मामा, मावसा काकाही तेथे आले होते. सुशील सुद्धा दुसरबिड येथे येणार होता.. मी मोटारसायकलने येतो तुम्ही पुढे व्हा असे त्याने त्याच्या कुटुंबीयांना सांगितले होते.
  
  यावेळी सुशील दुसरबिडला न जाता आधी त्याने बेलोरा गाठले. सपना घरी एकटीच असल्याचे त्याला माहित होते. तिथे गेल्यानंतर मी होणारा नवराच तर आहे असे म्हणत त्याने तिच्याशी जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले. लग्नाआधी "हे" करायला सपनाने विरोध केला, मात्र तरीही त्याने जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले असावेत असा संशय आहे. या प्रकारानंतर त्याने  धारधार शस्त्राने सपनाचा गळा चिरला, सपनाला रक्ताच्या थारोळ्यात टाकून सुशील फरार झाला.
     
दुसरबिडला बस्ता फाडण्यासाठी जमलेली मंडळी सुशीलची वाट पहात होती.  सुशीलचा भाऊ अमोल याने सुशीलला फोन करून बघितला मात्र फोन बंद येत होता. दुपारी दोनच्या सुमारास सपनाचे वडील संदीप जाधव यांना फोनवर सपना रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे कळले. सुशील तिचा खून करून पळल्याचे कळल्यानंतर बस्ता सोडून सगळे कुटुंबीय बेलोरा येथे पोहचले. त्यावेळी घरात सपना रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली..तिच्या अंगावरील कपडे इकडे तिकडे पडलेले होते.
    
खुनाचे कारण अस्पष्ट...!

सपना आणि सुशील फोनवर बोलत होते.. दोघांतील प्रेम बहरत होते..लग्न कसे करायचे याबद्दल दोघे तांसतास फोन वर बोलून भविष्याची स्वप्ने रंगवत होते. अगदी बस्ता फाडण्याच्या दिवसा पर्यंत सगळ काही ओके होते. मात्र सुशील दुपारी भेटायला आल्यानंतर त्या अर्ध्या तासात नेमक अस काय झालं? की सुशीलने थेट तिच्या हत्येचा निर्णय घेतला?  असे अनेक प्रश्न आता निर्माण झाले आहे. पोलिसांनी सुशील विरुद्ध बलात्काराचा व खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.