बैलांचा चारा पाणी करून गोठ्यात बांधले अन् लग्नासाठी घरी गेले! नंतर जे घडल ते त्यांच्यासाठी धक्कादायक होत..! शेगाव तालुक्यातील कनारखेडची घटना

 
iuh
शेगाव(विनोद भोकरे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेगाव तालुक्यातील कनारखेड येथे बैलजोडी चोरीला गेल्याची घटना घडली. शेतकऱ्याने याप्रकरणाची तक्रार शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
 

 कनारखेड येथील मुकिंदा  रामकृष्ण काळे या शेतकऱ्याने याप्रकणाची तक्रार दिली आहे. काल २९ मे च्या संध्याकाळी त्यांनी त्यांच्या शेतातील गोठ्यावर बैलांचा चारा पाणी केला. बैलजोडीला गोठ्यात बांधून ठेवले. त्यानंतर मुलाचे लग्न असल्याने ते घरी निघून गेले. आज,३० मे च्या सकाळी बैलांचा चारापाणी करण्यासाठी ते शेतात गेले,त्यावेळी गोठ्याची कडी त्यांना तुटलेली दिसली. गोठ्यात त्यांना त्यांची बैलजोडी दिसून आली नाही.  एक धामणा बहाळा आणि एक सोनारा रंगाचा असे दोन बैल अंदाजे किंमत ६१००० रुपये कुणीतरी अज्ञात चोरट्याने सुरू केले. ऐन पेरणीच्या तोंडावर बैल चोरी गेल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.