'गावकऱ्यांनो सतर्क रहा!' अन्यथा होवू शकतो पश्चाताप ; हिवरखेड पोलिसांचे गावकऱ्यांना 'या' कारणामुळे आवाहन!

 
Hjvv

खामगाव:(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मागील काही  दिवसांपासून  खामगाव तालुक्यात चोरीच्या घटनांचे  प्रमाण  मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसत आहे.
त्यामुळे वाढत्या  घटनांमुळे नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करावे जेणेकरून  वाढत्या घटनांना आळा बसेल याहेतूने  खामगाव तालुक्यातील हिवरखेड पोलिसांनी आपल्या हद्दीत येणाऱ्या गावातील ग्रामस्थांना  विशेष आवाहन केले आहे. ते पुढीलप्रमाणे 

 नागरिकांनी बाहेरगावी जातांना घरात जास्त पैसे, सोन्याचे दागिने ठेवू नये व अंगावर देखील दागिने परिधान करू नये  शिवाय बँकेत सुरक्षीत लाँकरमध्ये ठेवावेत, दिवसा अनोळखी किंवा संशयित व्यक्ती गावात,  शेतवस्तीवर पाहणी करताना दिसल्यास त्याची चौकशी करा. पोलीस पाटील अथवा पोलिसांना याबाबत कळवावे. आपण केलेला मोठा आर्थिक व्यवहार इतरांना माहित होणार नाही याची काळजी घ्यावी,   आर्थिक व्यवहार, खरेदी -विक्री मधून मिळालेले पैसे घरात न ठेवता बँकेत जमा करावे तसेच महिलांनी  गर्दीच्या ठिकाणी, लग्न व इतर कार्यक्रमाला जाताना कमीत-कमी दागिने घालून जावे. कारण या ठिकाणी चोरट्यांची नजर दागिन्यावर पडल्यास ते घरापर्यंत पाठलाग करून येवू शकतात, खोटी बतावणी- जसे की पुढे पोलिस आहेत तपासणी चालु आहे, पुढे खुन झाला आहे,तुमच्या अंगावरील सोने काढुन ठेवा अशी खोटी बतावणी करुन फसवणुक केली जाते. त्यामुळे त्यापासून खबरदारी बाळगावी. व चोरांपासुन सावध रहावे, एटीएम किंवा बँकेतुन पैसे काढल्यानंतर पैसे सुरक्षित ठेवावे. पैसे कोणी हिसकावुन अथवा बहाना करुन नेणार नाही याची दक्षता घ्यावी, बाहेरगावी जाताना शेजारी रहणाऱ्याला माहिती द्यावी , वाहनात मौल्यवान वस्तु ठेवु नये, नागरिकांनी गावात घर असेल तर शक्यतो शेतवस्तीवर राहु नये. शेत मालापेक्षा जीव खुप मौल्यवान आहे, अनोळखी महिला घरातील भांड्याला, चांदीला व सोन्याला पॉलिश करून देण्याचे बहाण्याने घरातील महिलांचा विश्वास संपादन करून फसवणूक करतात.

सर्व नागरिकांनी अश्या बाबतीत सतर्क राहून अश्या अनोळखी महिलांना बळी न पडता संशय वाटल्यास  पोलीस पाटील व पोलिसांना कळवावे,  ज्यांना शक्य आहे त्यांनी त्यांनी आपल्या घरासमोर सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यावेत, गावातील पोलिस पाटील, सरपंच, उपसरपंच, तरुण मुलांनी एक व्हॉट्स ग्रुप बनवावा त्यामुळे लहान -  मोठया काही घटना घडल्यास तात्काळ माहिती मिळेल,  सरपंच उपसरपंच, पोलीस पाटील , प्रतिष्ठित व्यक्ती यांनी पुढाकार घेऊन गावात ग्रामरक्षक दल स्थापन करून त्यांचा पोलिसांबरोबर पाठपुरावा करावा. तसेच त्यांना लाठ्या, शिट्या व इतर साहित्यासह आपल्या गावात रात्री १२ ते पहाटे ४ वाजेपर्यंत गस्त करावी, जेणे करुन गावात चोरीला आळा बसेल.

कोणतीही अप्रिय घटना अथवा माहिती मिळाल्यास तात्काळ हिवरखेड पोलीस स्टेशन येथे संपर्क करावा. असे आवाहन हिवरखेड पोलिसांनी आपल्या हद्दीतील गावकऱ्यांना केले आहे. सपोनि कैलाश पंढरीनाथ चौधरी, (ठाणेदार हिवरखेड पोलीस स्टेशन, जि.बुलढाणा)
मो.न 9823714504, 7972374079.
पोउपनि रमेश धामोळे,
मो.न.9823521325.
 पोउपनि लालसिंग चव्हाण,
मो.न.8208790510.