पाणीटंचाईचा बळी! ८ वर्षीय चिमुकलीचा विहिरीत पडून मृत्यू; देऊळघाटची घटना; आक्रमक गावकऱ्यांनी केला रास्तारोको

 
girl

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  पाणी टंचाईचा शाप लाभलेल्या बुलडाणा तालुक्यातील देऊळघाट येथील एक बालिका खोल विहिरीत पडून गंभीर जखमी झाल्याची घटना  घडली. आठ वर्षीय जखमी बालिकेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.  यामुळे संतप्त नातेवाईक व गावकऱ्यांनी  आज रास्ता रोको करीत प्रशासन व ग्रामपंचायत बद्धलचा रोष व्यक्त केला. 

दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस व बुलडाणा पंचायत समितीचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून सध्या गावात तणाव निर्माण झाला आहे. या रास्ता रोकोमुळे बुलडाणा अजिंठा मार्गावरील वाहतूक किमान चार तासापासून ठप्प झाली आहे. अंजली भरत शेजोळ( वय अंदाजे ८) असे मृतकचे नाव आहे. ती धनगर वाडी परिसरातील जमीन पातळीवर असलेल्या विहिरीतून पाणी आनण्यासाठी गेली असता तोल जाऊन विहिरीत पडली. यामुळे गंभीर जखमी झालेल्या अंजलीला रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू ओढवला. दरम्यान संतप्त नातेवाईक व गावकऱ्यांनी रास्ता रोको करीत अजिंठा राज्य मार्गावरील वाहतूक रोखली. या सर्वांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला.