VALENTINE SPECIAL मामाच्या पोरीच्या नादी लागलो अन् आयुष्याचा खेळखंडोबा झाला! ५ वर्षांचे पवित्र प्रेम "ती" एका क्षणात विसरली. मामा तर कंस निघाला! चिखलीच्या अक्षयने सांगितली त्याची LOVE स्टोरी...

 
Kraim
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): वैष्णवी माझ्या मामाची मुलगी.. लहानपणापासूनची आमची मैत्री..तिच्यासोबत घर घर भांडे खेळताना अनेकदा ती माझी बायको अन् मी तिचा नवरा व्हायचो..आधी आधी हा फक्त खेळ वाटायचा..मात्र मी ११ वीत गेल्यानंतर अन् ती १० वीत असताना आता मला ती प्रचंड आवडू लागली होती. तिच्या देहबोली वरून मीसुद्धा तिला आवडत असेल असे मला वाटत होते. आता लग्न करीन त तिच्याशीच हे मनाशी पक्के ठरवले होते. २०१७ च्या १४ फेब्रुवारीला तिला भेटून प्रपोज केलं अन् तीनही ते स्वीकारले. आता ती माझी प्रेयसी झाली होती चिखलीचा अक्षय (नाव बदलले आहे) त्याची वैष्णवी( नाव बदलले आहे )  सोबतची लव्ह स्टोरी सांगत होता....!

अक्षयच्या तुलनेत अक्षयच्या मामाच्या घरच्यांची परिस्थिती चांगली होती. अक्षयच्या वडिलांचे निधन झालेले, दोन बहिणींचे लग्न झालेले त्यामुळे घरी आई आणि अक्षय असे दोघेच राहत होते. स्वतःच्या शिक्षणासोबतच घरच्या शेतीचेही काम अक्षयला करावे लागत होते. हे सगळ सुरू असताना दोघांचे प्रेम बहरत होत..वैष्णवी ने अकरावीला शहरातील कॉलेजात एडमिशन घेतल्यानंतर तिच्या कॉलेजचे पोर तिच्यावर अक्षरशः जीव ओवाळून टाकायला तयार होते,मात्र  ती आधीच माझी झालेली होती. मात्र मी  खेड्यावरच्या कॉलेज मध्ये अन ती शहरातल्या कॉलेज मध्ये असल्याने मला काळजी वाटत होतीच.. आपल पाखरू आपल्या हातातून जावू नये असं नेहमी वाटायचं अस अक्षय सांगत होता..शिक्षणात आधीपासूनच रस नसल्याने अक्षय बारावीत इंग्रजी विषयात फेल झाला..त्यानंतर एटीकेटी मुळे बी. ए.प्रथम वर्षाला एका कॉलेज मध्ये अक्षय ने एडमिशन घेतली. दरम्यान ती कॉलेज च्या निमित्ताने चिखलीत यायची तेव्हा दोघेही भेटायचे.. चिखलीच्या रेणुका देवीच्या मंदिरात अनेकदा आम्ही दोघांनी जोडीने दर्शन घेतल्याचे अक्षय सांगत होता.

     
पवित्र प्रेम...!

   जेव्हा जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा फक्त प्रेमाची मिठी...यापेक्षा जास्त समोर आम्ही गेलोच नाही..आमचे प्रेमच पवित्र होते..त्यामुळे सगळ काही लग्नानंतर अस आमचं आधीच ठरलेल होत अस अक्षय सांगत होता..घरच्या व्यापामुळे अक्षयचे शिक्षणाकडे दुर्लक्ष होत होते तर दुसरीकडे १२ वीत चांगले गुण मिळवून वैष्णवी आता कॉलेजला गेली होती. दिवसातले किमान ५ तास आम्ही फोनवर बोलायचे..आतापर्यंत मी दिलेल्या गिफ्ट पेक्षा तिने दिलेले गिफ्ट जास्त असल्याचे अक्षय सांगतो.

१२ झाल्यानंतर तिला लग्नासाठी नोकरी वाल्या मुलांची स्थळे येऊ लागली...मामाच्या डोक्यात तसाही माझा विचार नव्हताच. कारण मामाला पोरगी नोकरीवाल्या मुलाला द्यायची होती..तिला स्थळे येत असल्याचे पाहून आपला प्रस्ताव एकदा मामाकडे टाकावा असा विचार मनात आला..मार्च २०२१ च्या " त्या" दिवशी आमच्या एका नातेवाईकाने पोरगी भाच्याला देऊन टाका, तुमच्या पोरीलाही तो आवडतो असे सांगितले. हे ऐकून मामाच्या तळपायाची आग मस्तकात गेली. मामा संध्याकाळी थेट आमच्या घरी आले..माझ्या दोन चार कानाखाली मारल्या..तुला हे शोभत नाही..आता मी इथेच मरतो..असे जोरजोरात ओरडू लागला..माझा मोबाईल घेऊन घरातच फोडला.. अन् मामा तनक्याने निघून गेले...मोबाईल नसल्याने आता वैष्णवी सोबत बोलता आले नाही..त्या रात्री मी प्रचंड रडलो.....( भाग १ समाप्त...भाग २ लवकरच प्रकाशित करणार आहोत)