"VALENTINE SPECIAL"! इश्कातून राहिली प्रेग्नेंट, नंतर केला अवैध गर्भपात! नंतर पोलिसांना म्हणे त्याने बलात्कार केला! तो जेलातून सुटल्यावर त्याच्यासोबतच पळून जाऊन केले लग्न!

इश्काच्या खेळात त्याने आईलाही गमावले! वाचा बुलडाण्याच्या राहुल - प्रियाची लव्ह स्टोरी...

 
Ghuf

बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): प्रेम म्हणजे प्रेम असतं अन् तुमचं आमचं सेम असतं.. असं जरी म्हटल्या जात असलं तरी ते खरच सगळ्यांचं काही सेमच नसतं हे समाजात सध्या घडत असलेल्या अनेक प्रेमप्रकरणातून दिसतय ..सध्या व्हॅलेंटाईन विक सुरू असून त्यात तर प्रेमाचा इजहार करण्याची चांगलीच स्पर्धा प्रेमीयुगलांमध्ये लागलेली दिसते..अनेक लव्ह स्टोऱ्या या व्हॅलेंटाईन विक मध्ये चर्चेच्या ठरत असतात. बुलडाणा शहरात सध्या एका आगळ्या वेगळ्या लव्ह स्टोरीची चर्चा सुरू आहे. बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात बलात्काराचा आणि अवैध गर्भपाताचा गुन्हा दाखल असलेल्या २३ वर्षीय तरुणाची आणि २० वर्षीय तरुणीची ही स्टोरी हटकेच आहे. आधी तिने प्रियकराविरुद्ध बलात्काराची तक्रार दिली, "इश्कातून गर्भधारणा" झाल्यानंतर गर्भपात करणारा डॉक्टरही या प्रकरणात सहआरोपी झाला. दरम्यान तरुण जेलमधून जामीनावर सुटल्यावर त्याच्या प्रेयसीचे डोळे उघडले अन् ती त्याच्यासोबत पळून गेली. मात्र त्याआधी मुलगा जेलमध्ये गेल्याचा धक्का आईला सहन न झाल्याने आईचा हार्ट अटॅक ने मृत्यू झाला..

राहुल आणि प्रिया (दोघांचेही नाव बदलले आहे) दोघांचेही ३ वर्षांपासून प्रेम संबंध होते. दोघांचीही जात वेगळी वेगळी असल्याने विवाह करतांना अडचणी येतील याची कल्पना दोघांनाही होती, मात्र त्याची जाण असताना सुद्धा दोघांनी एकमेकांसोबत आयुष्य काढण्याच्या आणाभाका घेतल्या होत्या. राहुल चे वडील वारलेले असल्याने आई व कुटुंबाची पूर्ण जबाबदारी त्याच्यावरच होती. एक खाजगी व्यवसाय सांभाळून  राहुल कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. दरम्यान दोघांचा इश्क अगदी टोकाला गेला होता. त्यातून राहुलने प्रियाशी अनेकदा शारीरिक संबंध ठेवले. त्यातून प्रियाला गर्भधारणा झाली. त्यावेळी बुलडाणा शहरातील सुंदरखेड भागात राहणाऱ्या एका डॉक्टरच्या मदतीने राहुलने प्रियाचा अवैध गर्भपात करवला.  त्यानंतरही बराच काळ दोघांचा इश्क सुरूच होता..

 दरम्यान २०२२ च्या मार्च महिन्यात एकुलता एक मुलगा असलेल्या राहुलचे लग्न उरकून टाकावे असा विचार राहुलच्या आईच्या मनात आला. राहुलचे मामा आणि इतर नातेवाईकांनी राहुलसाठी स्थळ बघितले आणि दोघांची पसंती झाल्यावर लग्नही ठरले..! राहुलच्या अफेअर बाबत कुटुंबीयांना मात्र फारसे माहीत नव्हते.

   पहिले लग्न मोडले..!

    लग्न ठरल्यावर राहुलने प्रियाशी बोलणे थांबवले. स्वतःच्या जातीतील सुंदर आणि चांगली मुलगी मिळाल्याने राहुल खुश होता. राहुलचा साखरपुडा झाल्याची बातमी कळल्यानंतर मात्र प्रियाच्या तळपायाची आग मस्तकात गेली. धोका मिळाल्याची भावना झाल्याने तिने आतापर्यंतची सगळी स्टोरी कुटुंबीयांना सांगितली. प्रिया तिच्या कुटुंबीयांना घेऊन राहुलच्या घरी धडकली. तिथे मोठा राडा झाला..मात्र तरीही राहुल प्रियाशी लग्न करायला तयार नसल्याने प्रियाने बुलडाणा शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. लग्नाचे आमिष दाखवून राहुलने बळजबरी शारीरिक संबंध ठेवल्याचे तिने तक्रारीत म्हटले. अवैध  गर्भपात केल्याचेही तक्रारीत म्हटले. त्यामुळे पोलिसांनी राहुलविरुद्ध बलात्काराचा तर अवैध गर्भपात करणाऱ्या डॉक्टर विरुद्ध सुद्धा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्याची माहिती कळताच राहुल फरार झाला..हा सगळा वृत्तांत कळल्यानंतर राहुलचे आधी ठरलेले लग्न मोडले.
      
राहुलला अटक..आईचा मृत्यू...!

दरम्यान फरार झालेल्या राहुलला बुलडाणा शहर पोलिसांनी अटक केली. मुलाकडून अनेक अपेक्षा असलेली आई डोळ्यासमोर होत असलेला हा सगळा कारनामा पहात होती. मुलाचे मोडलेले लग्न ,त्याला झालेली अटक या सगळ्या प्रकारामुळे ती अस्वस्थ झाली आणि हृदयविकाराचा झटका आल्याने तिचे निधन झाले. तो लहान असताना त्याचे वडील वारलेले आणि आता आई... यामुळे राहुल पूर्णत: पोरका झाला होता. तीन महिन्यांनी जामीन मिळाल्यावर राहुल आता मामाकडे राहू लागला होता...!

पुन्हा प्रियाशी सुत जुळले..!

दरम्यान आई गेली, लग्न मोडले, गुन्हा दाखल झाला आणि प्रियाशी सुद्धा फाटल्याने राहुल प्रचंड तणावात होता. जामीनावर सुटल्यावर तो एकाकी पडला होता. समाजात बदनामी झाल्याने त्याचे खच्चीकरण झाले होते. दुसरीकडे प्रियाच्या गर्भपाताची आणि "इश्काची स्टोरी" समाजात पसरल्याने तिच्याही लग्नात अडचणी येऊ लागल्या होत्या. दोन महिन्यांपूर्वी दोघांचा तुटलेला संपर्क पुन्हा जोडल्या गेल्या. कुटुंबियांच्या दबावामुळे दुसऱ्या मुलीशी लग्न करायला तयार झाल्याचे राहुलने प्रियाला समजावले..प्रियानेही दबावातच तक्रार दिल्याचे राहुल ला सांगितले..दोघांनाही त्यांचे जुने दिवस आठवले, एकमेकांना दिलेल्या आणाभाका आठवल्या अन् दोघांनी पळून जाऊन लग्न करायचा निर्णय घेतला..दोंघाचाही संसार आता सुरू झालाय..!!