...म्‍हणून मिळाली उत्तमरावांना जीवे मारण्याची धमकी!

देऊळघाट येथील घटना
 
तुझ्या बायकोला घेऊन ये तेव्हाच घरात रहा; दोन भावांमध्ये हाणामारी; बुलडाणा तालुक्यातील घटना
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ःशेतीच्या खुणा उपटल्याच्या कारणावरून शेतकरी व त्‍यांच्या मुलाला बेदम मारहाण करून तिघा बापलेकांनी जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना देऊळघाट शिवारात (ता. बुलडाणा) १६ नोव्‍हेंबरला दुपारी घडली. या प्रकरणी आज, १८ नोव्‍हेंबरला बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

उत्तम जानकिराम किटे (५३, रा. वाॅर्ड क्रमांक ६ देउळघाट, ता. बुलडाणा) यांनी या प्रकरणात तक्रार दिली. त्‍यांची देऊळघाट शिवारात ११ एकर शेती आहे. १६ नोव्हेंबरला दुपारी १२ ला ते व त्यांचा मुलगा गणेश शेतात काम करत हाेते. त्‍यावेळी शेताचे शेजारी असलेला सुभाष रामजी घट्टे (५०), त्‍याची मुले शिवाजी सुभाष घट्टे (३०) व पवन सुभाष घट्टे (३१, तिघे रा. देऊळघाट) यांनी किटे यांना शेताच्या खुणा का उपटल्या, असा जाब विचारला.

किटे काही सांगणार तितक्यात शिवाजीने गणेशचा गळा दाबून मारहाण सुरू केली. त्‍याला सोडविताना सुभाष व शिवाजीने काठी उत्तमरावांच्या डोक्यात मारली. पवनने गणेशला काठीने मारहाण केली आहे. भांडणे पाहून तातडीने दिलीप मथाजी हिवाळे, उत्तम भिका शेजोळ हे धावून आले आणि त्‍यांनी भांडण सोडवले. शेतीच्या खुणा उपटल्याच्या कारणावरून उत्तमराव व गणेशला घट्टे बापलेकांनी जीवे मारण्याची धमकी दिली. बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी उत्तमराव आले असता त्‍यांना उपचारासाठी सरकारी दवाखान्यात पाठवले. आज, १८ नोव्‍हेंबरला त्‍यांची प्रकृती ठिक झाल्याने पोलीस ठाण्यात येऊन उत्तमरावांनी तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी घट्टे बापलेकांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.