UPDATE मृत्यूशी झुंज सुरू होती, अखेर प्राणज्योत मालवली! चिठ्ठीतल्या तिघांचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा शहरातील समता नगर सागवन भागातील तरुण शेतकरी, तथा केबल ऑपरेटर निलेश दत्तात्रय डुकरे याने दोन दिवसांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आत्महत्येच्या आधी त्याने एक चिठ्ठी लिहून त्यात तिघांची नावे लिहून ठेवली होती. आता अखेर आज,२३ जुलैच्या दुपारी त्यांची मृत्यूशी झुंज संपली. 
मृत्यपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोट मध्ये निलेश डुकरे यांनी तिघांची नावे लिहिली आहेत. मात्र तपासाला बाधा होऊ नये म्हणून आम्ही याठिकाणी आरोपींची नावे प्रकाशित करण्याचे टाळत आहोत. दरम्यान या तिघा आरोपींना तातडीने अटक करण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे.