UPDATE क्रिष्णाचा मृतदेहही पोतडीत टाकला, शाळेची बॅग जवळच सापडली! संशयित आरोपीचे सीसीटीव्ही फुटेज "बुलडाणा लाइव्ह"कडे

 
शेगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेगाव तालुक्यातील नागझरी येथील क्रिष्णा राजेश्वर कऱ्हाळे यांच्या खुनाच्या बातमीने जिल्हाभर एकच हळहळ व्यक्त होत आहे. दोन दिवसांत अशा दोन घटना घडल्या आहेत. चिखली तालुक्यातील अंबाशी येथील अरहानचा खून झाल्याची घटना २३ जुलैला उघडकीस आली होती. दरम्यान नागझरी येथील १४ वर्षीय क्रिष्णाचे २३ जुलै रोजी अपहरण झाले होते, ट्युशन क्लास आणि शाळेत गेलेला क्रिष्णा घरी परतला नसल्याने शेगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता..दरम्यान आज त्याचा मृतदेहच भास्तन येथील जंगलात आढळला ,त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 
२३ जुलै रोजी सकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी क्रिष्णाला एक संशयित मोटारसायकल वरून घेऊन जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना प्राप्त झाले. त्यावरून पोलिसांनी त्या संशयीला ताब्यात घेऊन चौकशी केली, त्यानंतर हा खुनाचा उलगडा झाला. क्रिष्णा शेगाव येथील बुरुंगले विद्यालयात वर्ग आठवीत शिक्षण घेत होता. क्रिष्णाचा मृतदेह पोतडीत टाकलेला आढळला, त्याच्या मृतदेहाशेजारीच त्याची शाळेची बॅग पडलेली आहे..सद्या पंचनामा सुरू आहे.