जिल्ह्यात अवकाळीचा तडाखा : अंगावर वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू!

 
Bhhhd
बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)काल १५ फेब्रुवारीच्या संध्याकाळी जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली.  अवकाळी च्या तडाख्याने काही भागातील पिकांचे मोठे नुकसान झाले. रात्री झालेल्या अवकाळी पावसातच मोठी दुर्घटना घडली. त्यामध्ये खामगाव रोडवर अंगावर वीज पडून एका युवकाचा मृत्यू झाला. 

सुरज सुभाष निंबाळकर असे मृतकाचे नाव आहे. खामगाव रोड वरील जयपुर लांडे फाट्याजवळ त्यांच्या अंगावर वीज पडली. या दुर्घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. प्राप्त अहवालानुसार त्यांच्या वडिलांची टाकळी शिवारात शेतजमीन आहे.

पिकांचे झाले नुकसान! 

दरम्यान ११  तालुक्यात किरकोळ पाऊस झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
गहू ,शाळू,  हरभरा, मोहोर, उत्पन्नकमी होणार असल्याचा अंदाज आहे.