अज्ञात वाहनाने दुचाकीस्वाराला उडवले, जागीच ठार; चिखली तालुक्यातील घटना

 
file photo
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. आज, ३ जानेवारी रोजी दुपारी चारच्या सुमारास चिखली- देऊळगाव राजा रोडवरील असोला फाट्याजवळ हा अपघात झाला. गजानन वामन जाधव (५८, रा. तडेगाव, ता. सिंदखेडराजा) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
गजानन जाधव देऊळगाव महीकडून चिखलीकडे जात होते. त्याचवेळी असोला फाट्यावरील गुरुद्वाराजवळ मागून येणाऱ्या वाहनाने जाधव यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर धडक देणारे वाहन घटनास्थळावरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच अंढेरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मनोज वासाडे, पोकाँ श्री. पोफळे यांनी  घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तपास अंढेरा पोलीस करीत आहेत.