बुलढाण्याच्या जयस्तंभ चौकात आढळला अनोळखी वृद्धाचा मृतदेह ! ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन..

 
बुलडाणा
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) बुलडाणा शहरातील जयस्तंभ चौकात आज ६ जुलैच्या सकाळी आठ वाजता अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला. 
 प्राथमिक माहितीनुसार, अंदाजे ६०- ६५ वर्षाचे अनोळखी वृद्ध शहरातील जयस्तंभ चौकातील बुलढाणा अर्बनच्या इमारतीसमोर पडलेल्या अवस्थेत आढळले. दरम्यान, माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. तातडीने रुग्णवाहिकेद्वारे अनोळखी वृद्धाला जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. वैद्यकीय तपासातून वृद्धाचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. सध्या हा मृतदेह सामान्य रुग्णालयातच ठेवण्यात आला असून ओळख पटविण्याचे आवाहन बुलढाणा पोलिसांनी केले आहे.