LOVE STORY चा दुर्दैवी शेवट! प्रेयसीने दगा दिला! "अपनी रानी किसी की दिवानी हो गई" स्टेटस ठेवत देऊळावमहीच्या गजुने घेतला गळफास! तिला म्हणाला;मी मेल्यावर आठवण काढशील ना गं माझी..

 
Lovestory
देऊळगावमही (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ज्या मुलीवर प्रेम केले, तिनेच दुसऱ्यासोबत नाते जोडल्याने हताश झालेल्या देऊळगावमहीच्या तरुणाने "अपनी रानी किसी की दिवानी हो गई" असे स्टेटस ठेवत खंडोबा मंदिरात गळफास घेऊन आपली संपवली जीवनयात्रा संपवली.  १५ मार्चला पहाटे दोन  वाजता ही घटना घडली . दुसऱ्या स्टेटसवर 'मी मेल्यावर आठवण काढशील ना गं माझी...' अशा भावस्पर्शी ओळीही त्याने लिहिल्या होत्या.गजानन गुरव (२६) असे मृत युवकाचे नाव असून, तो देऊळगाव मही येथील अल्पसंख्याक काँग्रेसचा शहराध्यक्ष होता. 

गजाननने सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य करत परिसरात आपला मित्र परिवार जोडला. सामाजिक कार्यात सदा अग्रेसर व धडाडीचा कार्यकर्ता म्हणून त्याची ओळख होती. १३ मार्च रोजी दिवसभर आपल्या मित्र परिवारासोबत थांबला, मनमोकळ्या गप्पा मारल्या. रात्री अख्खे गाव झोपल्यानंतर १५ मार्चच्या पहाटे एक वाजता गजानन घराबाहेर पडला. आपल्या मरणा विषयीचे स्टेटस ठेवले. पहाटे दोन वाजता देऊळगावमही येथील खंडोबा मंदिरात त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर सुरेश रामदास गुरव यांनी पोलिसांत तक्रार दिली. शरद साळवे व नीलेश मोरे यांनी पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पुढील तपास पोलीस निरीक्षक जयवंत सातव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हेमंत शिंदे करीत आहेत. दरम्यान, प्राप्त माहितीनुसार, गजाननचे एका मुलीवर प्रेम होते. तिचेही होते. त्यामुळे प्रेमावर विश्वास ठेवणाऱ्या गजाननाला प्रेयसीकडून धोका मिळाला. यातूनच तो खचला. त्यातून त्याने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा गावात आहे.

मित्रांनो, आय ॲम सॉरी..!

गजानन गुरव १५ मार्चला पहाटे एक वाजता घराबाहेर पडून गावानजीक असलेल्या खंडोबा मंदिरात गेला. तेथून काही मित्रांना फोन केले, काहीशी संवाद साधला तर काहींनी प्रतिसाद दिला नाही. मात्र, याचदरम्यान त्याने काही स्टेटस ठेवले. 'आय ॲम सॉरी, मित्रांनो! मी सगळ्यांना सोडून जात आहे. मी गेल्यावर तुम्ही पण येणार ना माझ्या अंत्ययात्रेला, आज माझा जीव राहील, तर उद्या परत वाट बघेल तुझी. मी मेल्यावर न चुकता आठवण काढशील ना गं माझी...' असे विविध स्टेटस त्याने १.४५ वाजता सोशल मीडियावर ठेवले होते.

मित्रांनी केली इच्छा पूर्ण

एका स्टेटसवर अंत्ययात्रा दाखवली. अशीच माझी मिरवणूक काढा, असे त्याने नमूद केले. आपल्या मित्राची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी मित्रांनी फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टरच्या माध्यमातून गावातून अंत्ययात्रा काढत गजाननला शेवटचा निरोप दिला. यावेळी मित्रांसह ग्रामस्थांना अश्रू अनावर झाले.