दुर्दैवी! मुलीच्या लग्नपत्रिका वाटायला गेलेल्या पित्याचा अपघाती मृत्यू! दोन दिवसांवर येऊन ठेपले होते लग्न

 
jjfjffjdh

मोताळा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : मुलीच्या लग्नाची पत्रिका वाटण्यासाठी गेलेल्या पित्याचा ट्रक व दुचाकी अपघातात मृत्यू झाला. काल, २५ एप्रिलच्या संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास मलकापूर- बुलडाणा मार्गावर मूर्ती फाट्याजवळ घडली. या अपघातात मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे नाव काशीराम मंझा असे आहे.

  तालुक्यातील कुन्हा गोतमारा येथील काशीराम मंझा यांच्या मुलीचा दोन दिवसांवर विवाह येऊन ठेपला असल्यामुळे त्यांनी लग्नाच्या पत्रिका वाटण्याची लगबग सुरू होती. काशीराम मंझा हे मंगळवारी मुलीच्या लग्नाची पत्रिका वाटण्यासाठी त्यांच्या एमएच २८ एजी ६९१ क्रमांकाच्या दुचाकीने खैरखेड येथे गेले होते. पत्रिका वाटल्यावर परत येत असताना मूर्ती फाट्याजवळील वळणावर त्यांच्या दुचाकीला मलकापूरकडून बलढाणाकडे भरधाव जाणाऱ्या एमएच-३०-एल-२४६५ क्रमांकाच्या ट्रकने धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील काशीराम मंझा हे त्यांच्या दुचाकीसह ट्रकच्या चाकाखाली आले. त्यात ते गंभीर जखमी झाले. अपघातस्थळी जमलेल्या नागरिकांनी त्यांना रुग्णवाहिकेतून बुलडाणा येथील सामान्य रुग्णालयात हलविले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मंझा यांच्या अपघाती निधनामुळे कुन्हा गोतमारा गावावर शोककळा पसरली आहे. यावेळी अपघातग्रस्ताला एपीआय विकास पाटील, नंदकिशोर धांडे, दीपक पवार आणी मंगेश पवार यांनी रुग्णालयात दाखल केले.