अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू! सुलतानपुर येथील घटना.
Apr 3, 2024, 21:25 IST
सुलतानपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) भरधाव वेगातील अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण जागीच ठार झाल्याची घटना आज सायंकाळी ७.२० वाजे दरम्यान घडली .
प्राप्त माहिती नुसार सुलतानपुर येथुन जवळच असलेल्या पारडी सिरसाट येथील रामदास विश्वनाथ काळे वय ४९ वर्ष हे सुलतानपुर येथून आपल्या पारडी या गावी क्र. एमएच २८ बी.टी ५२ ७० क्रमांकाच्या दुचाकीने जात असताना सुलतानपुर येथील लोणार रोड वरील कब्रस्थान जवळ अज्ञात वाहनाने काळे यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. अचानकपणे झालेल्या धडकेत रामदास विश्वनाथ काळे हे जागीच ठार झाले . घटनेची माहिती मिळताच अनेकांनी अपघातस्थळी धाव घेतली. त्यांनतर रुगणवाहिकेतून काळे यांचे पार्थिव मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. मेहनती असलेल्या रामदास काळे याच्या अपघाती निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.