शुल्लक कारणांवरून दोन महिलांचा वाद! परस्पर तक्रारीवरून गुन्हा दाखल..

 
Gvvj

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शुल्लक कारणावरून येथील व्यंकटेश नगरात शेजारी राहणाऱ्या महिलांमध्ये वाद होऊन मारहाण झाल्याच्या परस्पर तक्रारी वरून दोन्ही महिलां विरोधात २२ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 
याबाबत सौ. किरण शेख शहारुख वय २७ वर्षे यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली की, २१ मे रोजी रात्री ११ वा. शेजारी राहणारी वर्षा अरविंद पहुरकर ही माझ्या घरासमोर आली व मला म्हणाली, "की तु नेहमी रात्री बे रात्री दोन-दोन वाजता जोरजोराने बोलते असे म्हणून वाद घालून मला शिवीगाळ करून चापटा बुक्यांनी मारहाण केली, अश्या तक्रारीवरून वर्षा अरविंद पहुरकर विरुद्ध कलम ३२४, ५०४, ५०६ भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सौ. वर्षा अरविंद पहुरकर ( ३५ वर्षे) यांनी पोलिसात फिर्याद दिली की, माझ्या शेजारी राहणारी किरण शेख शाहरुख ह्या मोठमोठ्याने मला
शिवीगाळ करित होत्या, तेव्हा मी व माझी मुलगी प्रतीक्षा त्यांचे घरासमोर उभे राहुन किरण शेख शाहरुख यांना शिवीगाळ करु नको व जोरजोरात बोलु नको असे म्हटले असता तिने मला शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली व माझी मुलगी प्रतीक्षा हिला लोटपाट केली. अशा रिपोर्ट वरून सौ. किरण शेख शाहरुख विरुद्ध कलम ३२४, ५०४, ५०६ भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.