दोन मोटारसायकली समोरासमोर धडकल्या! १२ वीच्या विद्यार्थ्यांसह आणखी एक गंभीर जखमी! मेहकर डोणगाव रोडवर झाला अपघात

 
Ndjdn
मेहकर(अनिल मंजुळकर:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक झाल्याने दोघे गंभीर जखमी झाले. मेहकर डोणगाव रस्त्यावर ६ जुलैच्या दुपारी हा भीषण अपघात झाला. जखमींपैकी एकजण वर्ग १२ विचा विद्यार्थी आहे. तो शिकवणी वर्गासाठी जात होता.
प्राप्त माहितीनुसार श्याम गजानन वैराळ (१८) आणि अमोल गायकवाड( रा.डोणगाव) अशी जखमीची नावे आहेत. प्राथमिक उपचार केल्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने दोघांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरला हलविण्यात आले आहे. श्याम वैराळ हा वर्ग १२ वीत शिकत आहे, तो शिकवणी वर्गासाठी जात असताना त्याची आणि अमोल गायकवाड यांच्या दुचाकीची समोरासमोर धडक झाले यात दोघे गंभीर जखमी झाले. दरम्यान अल्पवयीन मुले शिकवणी वर्गासाठी जातांना लायसन्स नसतांना मोटारसायकली घेऊन जातात याकडे पालकांसह पोलिसांनी लक्ष देण्याची गरज आहे. नव्या ठाणेदारांनी सुसाट मोटारसायकल चालविणाऱ्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.