खामगावात दोन घरे फोडली! घरमालक बाहेरगावी गेल्याची माहिती मिळाली अन् चोरट्यांनी गेम केला...

 
खामगाव
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगाव शहरात घरफोडीच्या दोन घटना घडल्या आहेत. खामगाव शहर पोस्टेच्या हद्दीत या घटना घडल्या. 
  Bhutekar
Advt 👆
दोन वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडी होवून लाखोचा मुद्देमाल लंपास करण्यात आला. यामध्ये डी. पी. रोड भागातील पंकज अग्रवाल (आर्किटेक्चर) हे बाहेरगावी गेले आहे. तर दुसऱ्या घटनेत सुटाळा खु. येथील पती- पत्नी घर बंद करून अकोला येथे उपचारासाठी गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी लाखोचा मुद्देमाल लंपास केला.
  स्थानिक डीपी रोड भागातील रहिवासी पंकज अग्रवाल बाहेरगावी गेले आहे. त्यामुळे या घटनेची अद्याप पोस्टेला तक्रार दिली नाही. तर दुसऱ्या घटनेत सहदेव लक्ष्मण सातव वय ५० वर्षे रा. सुटाळा खु. यांनी शहर पोस्टेला तक्रार दिली की, ते व त्यांच्या पत्नी घराला कुलूप लावून उपचार करण्यासाठी अकोला येथे गेलो. दरम्यान १० ते ११ ऑगस्ट दरम्यान अज्ञात चोरट्याने दुकान व घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून दुकानातील ड्रावरमध्ये ठेवलेले ७ हजार रूपये, घरातील कपाटामधील नगदी ९४ हजार रूपये, सोन्याची गहू पोथ, ७ ग्रॅम किंमत ३२ हजार रूपये, सोन्याची अंगठी १० ग्रॅम किंमत ३० हजार
रूपये, लॅपटॉप किंमत २९ हजार
रूपये असा मुद्देमाल चोरून नेला.
अशा तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द कलम ३१ (४), ३०५ (ए) बीएनएन- २०२३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान पोलिसांनी दोन्ही घटनास्थळी श्वानपथक व फिंगरप्रिंट एक्स्पर्ट यांना पाचारण केले. पुढील तपास शहर पोस्टेचे पोलीस करीत आहे.