मकरध्वज खंडाळ्यात धार्मिक स्थळाच्या वादातून दोन गट पुन्हा आमनसामने!

 
दोन लाख दिले असते तर आमचा मुलगा असा वागला नसता… तीन दिवस ठेवले उपाशी!; चिखलीतील विवाहितेची पोलीस ठाण्यात आपबिती!!
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली तालुक्यातील मकरध्वज खंडाळा गावात धार्मिक स्थळाच्या वादातून पुन्हा एकदा दोन्‍ही गटांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. चिखली पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारीवरून दोन्ही गटांविरुद्ध गुन्हे दाखल केले.

काल, ७ जानेवारीला सकाळी दोन्ही समाजात वाद उफाळला. रउफ शहा हबीब शहा (६०, रा. मकरध्वज खंडाळा) यांनी तक्रार दिली, की मकरध्वज खंडाळा शिवारातील शेतात पूर्वीपासून एक धार्मिक स्थळ आहे. या स्थळाबाबत गावातील लोकांसोबत वाद कोर्टात सुरू आहे. असे असताना गावातील विठ्ठल नारायण ठेंग, कैलास रामराव ठेंग, योगेश भास्कर पऱ्हाड, रामकृष्ण दामोधर ठेंग, गजानन भगवान ठेंग, गजानन भगवान ठेंग ऊर्फ महाराज, शिवाजी आप्पाराव देशमुख व इतर (सर्व रा. मकरध्वज खंडाळा) यांनी बेकायदेशीर जमाव जमवून अश्लील शिवीगाळ केली. त्‍यांची पत्नी व काही मंडळी भांडण सोडवण्यासाठी आले असता त्यांनाही लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

दुसऱ्या गटाकडून गजानन भगवान ठेंग (रा. मकरध्वज खंडाळा) यांनी तक्रार दिली आहे. रउफ शाह हबीब शाह, रहीम शाह यालीम शाह, कलीम शाह रहीम शहा, मोबिन शाह सरदार शहा, मोसीन शाह बिलाल शहा, आमीन शाह सरदार शहा, शहेनशहा रउफ शाह, बिलाल शाह यासिन शाह, खालीप शाह यासिन शाह, उबर शाह कंकर शाह, मतीन शाह सरदार शाह, इसूर शाह गुलजार शाह, मुस्ताक शाह बिलाल शाह, रशीर शाह इमाम शाह, इरफान शाह रउफ शाह, इस्‍त्राईल शाह सलीम शाह, मुजिफ मोला मास्तर शाह रउफ शाह (सर्व रा. मकरध्वज खंडाळा) यांनी बेकायदेशीर जमाव जमूवन देवदर्शनासाठी आलेल्या लोकांना अश्लील शिविगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली. या तक्रारीवरून चिखली पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे. तपास ठाणेदार अशोक लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली नायक पोलीस कॉन्स्टेबल विजय गीते करीत आहेत.