दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या! दोन तरुणांचा मृत्यू; धाड चांडोळ रस्त्यावरील घटना..!

 
ghjk
धाड ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा तालुक्यातील धाड - चांडोळ रस्त्यावर आज,३० मे च्या सायंकाळी भीषण अपघात झाला. दोन मोटारसायकल समोरासमोर धडकून दोन तरुण ठार झाले.  संध्याकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला.
 

गणेश मंगलसिंग पाकळ (२७ रा. चांडोळ), आणि राहुल सखाराम जेउघाले (२१, रा धामणगाव धाड) अशी अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत. गणेश धाड वरून चांडोळ कडे जात होता तर राहुल जाफ्राबाद तालुक्यातील साखळडोह वरून परत येत होता. सावळी गावाजवळ दोघांच्या मोटारसायकली समोरासमोर धडकल्या. दोघांच्याही डोक्याला जबर मार लागल्याने दोघेही जागीच ठार झाले. धाड पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला.मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला.