दोन दुचाकीं समोरासमोर धडकल्या एक ठार, दोघांची मृत्यूशी झुंज! मलकापूर पांग्रा - दुसरबीड रस्त्यावरील घटना

 
crime

दुसरबीड (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मलकापूर पांग्रा दुसरबीड मार्गावर  दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकजण ठार झाला तर दोनजण गंभीर जखमी झाले आहेत.

या अपघातामध्ये चंद्रकांत शंकर गुंजाळ याचा मृत्यू झाला असून, भारत गुंजाळ (रा. दुसरबीड) आणि रामा नामदेव गुंजकर (रा. बोरखेडी शेवाळे) हे दोघे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर मलकापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

२६ एप्रिल रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास चंद्रकांत शंकर गुंजाळ व भरत गुंजाळ हे दोघे दुचाकीवर (एमएच २८ बीसी २०३१) दुसरबीडकडे येत होते.दरम्यान, दुसरबीडकडून बीबीकडे जाणाऱ्या (एमएच १२ आरसी २३०६) क्रमांकाच्या गाडीवर रामा नामदेव गुंजकर हा बोरखेडी शेवाळे येथे गावी जात असताना दुसरबीड गावाच्या पूर्वसनगर माळ ठिकाणी दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली. त्यात चंद्रकांत शंकर गुंजाळ यांचा मृत्यू झाला तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले.त्यांना जालना येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. याप्रकरणी किनगाव राजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.