दोन दुचाकींची समोरासमोर धडक; एक जागीच ठार..! दुसरा गंभीर जखमी; विहिगाव - अटाळी रस्त्यावर झाला अपघात..!

 
gggh

खामगाव( बुलडाणा लाइव्ह  वृत्तसेवा):दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन एक जण ठार झाल्याची घटना खामगाव तालुक्यातील विहीगाव येथे आज ११ जून रोजी घडली आहे.

विजय शेगावकर (वय ५८ वर्ष रा.विहीगाव ता.खामगाव) असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे.विजय शेगावकर हे विहीगावावरून मोटारसायकलने दुपारी २ वाजताच्या दरम्यान अटाळी येथे जात होते, मात्र याच वेळी विहीगाव - अटाळी रोडवरील वळणावर अटाळी कदम येणाऱ्या दुसऱ्या मोटारसायकलीने शेगावकर यांच्या मोटारसायकल ला धडक दिली त्यामुळे शेगावकर याचा जागीच झाला. समोरून येणाऱ्या मोटरसायकलवर तिघे जण होते त्यामधील एक गंभीर जखमी असून त्याला पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले आहे.