ऑटोला ओव्हरटेक करण्याच्या नादात दोन दुचाकींची समोरासमोर धडक!एक ठार, तीन जखमी खामगाव तालुक्यातील घटना
Sun, 7 May 2023

खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ऑटोला ओव्हरटेक करण्याच्या नादात दोन दुचाक्यांची समोरासमोर धडक होऊन एकजण जागीच ठार झाल्याची घटना खामगाव अकोला रोडवर भवानी पेट्रोलपंप जवळ घडली आहे.
झाले असे की खामगाव अकोला रोडवरील भवानी पेट्रोलपंप जवळ ६ मार्चच्या सकाळी १०:३० वाजताच्या दरम्यान ऑटोला ओव्हरटेक करण्याच्या नादात दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली आहे. यामध्ये एकजण जागीच ठार झाला तर तिघे जखमी झालेत. यामध्ये वासुदेव वानखडे (५५) रा. धानोरा महासिद्ध ता. जळगाव जामोद हे ठार झाले आहेत तर सविता देवराव तायडे (५२) संगीता सदानंद दामोदर (४५) संदेश देवराव तायडे (२५) सर्व रा.अकोला हे तिघे जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या तिघांनाही तातडीने खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.