जुन्या भांडणावरून दोघांची एकास मारहाण; डोक्यात कुऱ्हाड मारून केले जखमी! जळगाव जामोद पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा..

 
Yfhf
जळगाव जामोद(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जुन्या भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ करत लोखंडी रॉड तसेच कुऱ्हाडीने एकास बेदम मारहाण केल्याची घटना १२ मे, रविवारी जळगाव जामोद तालुक्यातील गोळेगाव हुरसाळ येथे घडली. प्रकरणी प्राप्त तक्रारीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 
राजू देविदास हूरसाळ , संतोष देविदास हूरसाळ (रा. गोळेगाव हुरसाळ ) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. प्रकरणी अमोल अंबादास घुळे यांनी पोलिसांत तक्रार दिली की, गावातच राजू हुरसाळ यांचे शेताजवळ त्यांचे शेत आहे. आठ दिवसांपूर्वी राजू हुरसाळ याने डीपी जळाल्याच्या कारणावरून "तुझ्यामुळे डीपीवरील फ्यूज जळतात, तू काळजी घेत नाही असे म्हणत फिर्यादी अमोल घुळे यांच्याशी वाद केला होता. त्यावेळी ते म्हणाले की, 'मी काही केले नाही तु मला काही बोलु नको'. त्यानंतर तुला ऐखादे दिवशी दाखवीतो अशी धमकी राजू हुरसाळे यानी दिली होती. दरम्यान, १२ मे, रविवार रोजी रात्री ८:३० सुमारास अमोल घुळे शेतातून मोटरसायकलने घरी जात असताना 
  राजु हुरसाळ याच्या घरासमोर राजु देवीदास हुरसाळ व संतोष देवीदास हुरसाळ हे दोघे त्यांचे जवळ आले. 'तु त्या दिवशी शेतात जास्त बोलत होता असे म्हणत राजू हुरसाळने शिवीगाळ केली तसेच संतोष हुरसाळ याने त्याचे हातातील लोखंडी पाईप अमोल घुळे यांचे कपाळावर मारले व राजु हुरसाळ याने त्याचे हातातील कु-हाड डोक्यात मारुन जखमी केले. अमोल घुळे यांच्या डोक्याला जखम होवुन रक्तस्त्राव होत होता 'तुला आज खल्लास करुन टाकतो अशी धमकी राजूने दिली. तितक्यात घुळे यांचा चुलत भाउ भागवत सारंधर घुळे हा तिथे आला. त्याने घुळे यांना त्या दोघांच्या तावडीतुन सोडविले. व भागवत सारंधर घुळे व एकनाथ सारंधर घुळे अमोल घुळे यांना गाडीवर बसवून पोलीस स्टेशनला आणले. त्यांनतर राजु देवीदास हुरसाळ व संतोष देवीदास हुरसाळ यांनी जुण्या भांडणाच्या कारणावरुन लोखंडी पाईप व कु-हाडीने मारुन जखमी केले अशी तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस करत आहे.