BREAKING बुलडाण्यातील खून प्रकरणातील २ आरोपींना अटक ! वाचा "त्या" दोघांनी आशुतोषचा खून का केला? खुनी आशुतोषला ओळखतही नव्हते! मग "त्या" १५ मिनिटांत असं काय घडल?

 
Vhbb
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा शहरात काल भीमजयंतीच्या दरम्यान आशुतोष पडघान या तरुणाचा खून करण्यात आला होता. बुलडाणा शहर पोलिसांनी या प्रकरणात अतिशय वेगवान तपास करून दोन आरोपींना गजाआड केले आहे. आज दिवसभरात ८ ते९ संशयितांची कसून चौकशी करण्यात आली त्यानंतर दोघांना या हत्येसाठी जबाबदार धरण्यात आले. संजय विजय हिवाळे (२३) व सुमित समाधान हिवाळे (२५) दोघेही रा. सुंदरखेड अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक आशुतोष आणि आरोपी संजय व सुमित हे एकमेकांना ओळखत देखील नव्हते. रात्री साडेदहाच्या सुमारास दारू पिलेला आशुतोष सुंदरखेड येथील भीमजयंती मंडळात नाचण्यासाठी घुसला.आशुतोषचे स्वतःवर नियंत्रण नव्हते. नाचता नाचता आशुतोष चा धक्का संजय व सुमित यांना लागला. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. मंडळाचा सदस्य नसतांना तू इकडे कशाला आला असे म्हणत संजय आणि सुमित यांनी आशुतोषला बेदम मारहाण केली,चाकूने त्याच्यावर वार केले. उपचारादरम्यान आशुतोषचा मृत्यू झाला.
  दरम्यान आज पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे ८ ते ९ जणांची कसून चौकशी केली. त्यातून सुमित आणि संजय या दोघांनी आशुतोषची हत्या केल्याचे समोर आले. रात्री साडेसात वाजता कायदेशीररित्या दोघांच्या अटकेची कारवाई करण्यात आल्याचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांनी बुलडाणा लाइव्ह शी बोलतांना सांगितले. याप्रकरणात पुढील तपास सुरू असल्याचेही ते म्हणाले.