हळद लागली, लग्नाची तयारीही झाली पण... लग्नाच्या आदल्या रात्रीच नवरी बेपत्ता! चिखलीच्या संभाजीनगरातील धक्कादायक घटना; पोलीस ठाण्यात तक्रार! जिल्ह्यात २ दिवसांत ५ गायब

 
Hjgd
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात बेपत्ता होणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत असतानाच चिखलीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. हळद लागल्यानंतर रात्री नवरी बेपत्ता झाली. सगळीकडे शोधाशोध होऊनही नवरी मुलगी न सापडल्याने कुटुंबीयांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पूजा विजय लोखंडे (१८, रा. संभाजीनगर, चिखली) असे बेपत्ता झालेल्या नवरीचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार काल,१३ मार्चला पुजाचे लग्न ठरले होते. त्यासाठीची पूर्ण तयारी देखील झाली होती. मात्र १२ मार्चच्या रात्री पूजा अचानक गायब झाली. तिचा शोधाशोध घेऊनही न सापडल्याने चिखली पोलीस ठाण्यात पूजा हरवल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी दिली. दरम्यान जिल्ह्यात १२ आणि १३ मार्च या दोन दिवसांत ५ जण गायब झाल्याची नोंद आहे. अमोल दशरथ बावणे (३३) हा सैलानी येथून बेपत्ता झाला. ईश्वर श्रीकृष्ण सांगोळे (१८) हा तरुण शेगाव येथून बेपत्ता झाला. योगिता धनराज देशमुख (२४) ही शंकर नगर, खामगाव व पौर्णिमा दत्तात्रय कलोरे (१८) ही फुलेनगर शेगाव येथून बेपत्ता झाली आहे.