तुळशीचे लग्न लागले अन् बेपत्ता होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली! जिल्ह्यात ६ दिवसांत २३ बेपत्ता; लग्न झालेल्या विवाहिताही गेल्या सोडून...

 
kdid

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा जिल्ह्यातून बेपत्ता होणाऱ्यांची आकडेवारी चिंताजनक आहे. "बुलडाणा लाइव्ह" ने सातत्याने हा विषय लावून धरलाय. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर जिल्ह्यात आल्या होत्या तेव्हा त्यांनी देखील बेपत्ता होणाऱ्यांच्या बाबतीत चिंता व्यक्त केली होती. काही महिला मुलींना आखाती देशात वेश्याव्यवसाय करण्यासाठी नेण्यात आले होते, त्यांची सुटका केल्याचेही त्यांनी सांगितले होते. दरवर्षी लगीन सराई सुरू झाली की बेपत्ता होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढते.यंदाही तुळशीचे लग्न आटोपले अन् बेपत्ता होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे चित्र आहे.

Dhanik

                                       जाहिरात 👆

 बुलडाणा जिल्ह्यात २८ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या अवघ्या ६ दिवसांत २३ जण बेपत्ता झालेत. यात १४ तरुणी / महिलांचा समावेश आहे. ९ तरुण देखील गायब झाले आहेत. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात याप्रकरणी मिसिंग दाखल करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे काही लग्न झालेल्या विवाहिता देखील गायब होत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. गायब होणारे १८ वर्षापेक्षा अधिक वयाचे असतात तेव्हा पोलीस मिसिंग दाखल करतात. मात्र अल्पवयीन मुलगी केव्हा मुलगा गायब होतात तेव्हा अशा प्रकरणात पोलीस अपहरणाचा गुन्हा दाखल करतात. अपहरणाच्या प्रकरणात पोलीस वेगवान तपास करतात मात्र मिसींग प्रकरणात पाहिजे तेवढ्या गतीने तपास होत नाही.