दुःखद ब्रेकिंग! पोहायला गेलेल्या दोन चिमुकल्यांचा धरणात बुडून मृत्यू; चिखली तालुक्यातील करवंड गावावर शोककळा! म्हशींना पाणी पाजायला गेलेल्या शेतकऱ्याला काठावर दिसले कपडे अन् चपला

(जाहिरात👆)
प्राप्त माहितीनुसार अनिकेत आणि दोघे मित्र काल, दुपारी गावाशेजारी असलेल्या धरणावर पोहायला गेले होते. अनिकेतला पोहायला येत होते मात्र आदित्यला पोहता येत नव्हते. दरम्यान पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले व गाळात फसले. संध्याकाळी साडेपाच च्या सुमारास गावातील एक शेतकरी म्हशींना पाणी पाजण्यासाठी धरणावर गेला त्यावेळी तलावाच्या काठावर चपला व कपडे पडल्याचे त्यांना दिसले.
त्यामुळे शेतकऱ्याने गावात जाऊन गावकऱ्यांना ही माहिती दिली. पाठोपाठ गावकऱ्यांनी धरणावर गर्दी करून शोध घेण्याचा प्रयत्न केला. गावातीलच शालीग्राम गवई यांनी पाण्यात उतरून शोध घेतला असता त्यांच्या पायाला मुलांचे डोके लागले. त्यामुळे दोन्ही मुले गाळात फसल्याचे त्यांच्या लक्षात आले. गावकऱ्यांच्या मदतीने अनिकेत आणि आदित्यचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. दोघेही दुपारपासून पाण्यात बुडालेले असल्याने खेकडे आणि माशांनी मुलांना भक्ष बनवल्याचे दिसून आले. रात्री उशिरा अनिकेत वर अंत्यसंस्कार करण्यात आले तर आदित्यचे वडील सुरतला कंपनीत कामाला असल्याने त्यांना यायला उशीर झाल्याने आदित्य चा अंत्यविधी आज सकाळी पार पडला. या घटनेमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.