ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; १ ठार

मोताळा तालुक्यातील घटना
 
 
दुचाकीस्वार बुलडाणेकरांनो जरा ही बातमी वाचा… त्‍या दुर्लक्षामुळे अपघात, युवक गंभीर जखमी; बुलडाणा तालुक्‍यातील घटना

मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार युवकाचा मृत्‍यू झाला. ही दुर्घटना धामणगाव बढे - पिंपळगाव देवी रस्त्यावरील रिधोरा फाट्याजवळ आज, २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास घडली.

गोविंद दिनकर भालेराव (३३, रा. मानेगाव, ता. जळगाव जामोद) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. अपघातानंतर ट्रॅक्टरचालक घटनास्थळावरून पसार झाला. स्थानिक नागरिकांनी गंभीर जखमी अवस्थेत भालेराव यांना रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा रुग्णालयात पाठवले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच धामणगाव बढे पोलिसांनी ट्रॅक्टर पोलीस ठाण्यात जमा केले आहे. वृत्त लिहीपर्यंत पुढील कारवाई  सुरू होती.