अल्पवयीन मुलीला चुकीच्या ठिकाणी स्पर्श केला! बुलडाण्यात माजी जिल्हा परिषद सदस्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल! हरबरा सोंगणीवरून वाढला वाद..

 
Bbbb

बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ठोक्याने घेत असलेल्या शेतात हरबरा सोंगत असताना तीन जणांनी येऊन महिलांना काठीने मारहाण केली. महिलांसोबत असलेल्या एका अल्पवयीन मुलीला वाईट उद्देशाने चुकीच्या ठिकाणी स्पर्श केला. अशा तक्रारीवरून माजी जिल्हा परिषद सदस्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. काल, १६ फेब्रुवारीला येळगाव शिवारात ही घटना घडली.

बुलडाणा शहरातील जोहरनगर भागात राहणाऱ्या २२ वर्षीय महिलेने याप्रकरणाची तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार महिलेने येळगाव शिवारातील प्रितेश संचेती यांचे शेत ठोक्याने केले आहे. या शेतात त्यांनी हरबरा पेरला होता. १६ फेब्रुवारीला महिला मजुरांना सोबत घेऊन हरबरा सोंगत असताना माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश सिनकर त्यांच्या वडील व मुलासह "त्या" शेतात पोहचले.

तुम्ही हरबरा कसा काय सोंगत आहात? असे विचार सिपने परिवारातील तिघांनी महिलेला शिवीगाळ करून मारहाण केली. याशिवाय महिलेच्या १२ वर्षीय मुलीला बाजूला ओढत तिला चुकीच्या ठिकाणी स्पर्श केला असेही महिलेने तक्रारीत म्हटले आहे. या प्रकारानंतर महिलेने बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश सिनकर सह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.